नांदेड ताजी बातमी : उमरीत चार कोरोना रुग आढळले ..जिल्ह्यात रुग्णसंख्या 137 तर 79 रुग्ण कोरोणामुक्त ….

उमरी ठळक घडामोडी नांदेड जिल्हा

नांदेड  : नांदेड शहरात आज दि. 26 रोजी रात्री आलेल्या अहवालात प्राप्त झालेल्या 122 अहवालापैकी 111 रुग्णांचा निगेटिव्ह अहवाल प्राप्त झाला त्यात उमरी येथील 4 रुग्णांची कोरोना टेस्ट पॉजिटिव्ह आली आहे तर जिल्हयात एकुण 137 कोरोना रुग्णसंख्या झाली आहे.

आज प्राप्त झालेल्या 4 पॉजिटिव्ह रु ग्णांपैकी ( एक
पुरुष व तीन स्त्री आहेत.

या सर्व रु ग्णावर औषध उपचार सुरू असून त्यांची प्रकृती सद्यस्थितीत स्थिर आहे.

आज दिनांक 26 रोजी  एनआरआय यात्री निवास कोव्हिड सेंटर येथील 16 रु ग्ण बरे झाल्यामुळे त्यांना
रु ग्णालयातून सुटी देण्यात आलेली आहे आतापर्यंत 137 पॉजिटिव्ह रु ग्णांपैकी 79 रु ग्णांना रु ग्णालयातून सुटी देण्यात आलेली आहे व ऊर्वरित 51
रु ग्णावर औषधोपचार चालू असून  त्यातील दोन   स्त्री रुग्णांची प्रकृती  गंभीर  आहे  तर  मृत्यू  झालेल्या  रुग्णांची  संख्या  7 झाली असल्याचे  जिल्हा  शल्य  चिकित्सक डॉ  निळकंठ  भोसीकर  यांनी  प्रसिद्धी पत्रकाद्वारे  सांगितले .

 

उमरी मध्ये सापडलेले हे चार ही रुग्ण बाहेरून आलेले सांगण्यात येते .