मास्क नाही , सॅनिटाझर नाही, कोणतीही  सुविधा नाही …! सांगा कशी करावे कोरोना डयुटी ; शिक्षकांनी मांडल्या आपल्या व्यथा……

ठळक घडामोडी नांदेड जिल्हा मुखेड
मुखेड : ज्ञानेश्वर  डोईजड

कोरोना आपत्ती व्यवस्थापन समिती अंतर्गंत तहसिलदार यांच्या आदेशानुसार शिक्षकांची नेमणुक करण्यात आली पण मास्क नाही , सॅनिटाझर नाही, कोणतीही  सुविधा नाही …! सांगा कशी करावे कोरोना डयुटी अशी शिक्षकांनी आपल्या व्यथा मांडल्या.

शिक्षकांना मुंबई, पुणे येथुन येणा­ऱ्या गाडी तपासणीसाठी शहरातील लोखंडे चौक येथे डयुटी देण्यात आली. या शिक्षकांना प्रशासनाकडुन कोणतीच सुविधा नसल्याने भयभयीत झाले आहेत. प्रशासनाकडून त्यांना सेफ्टी म्हणुन कोणतेच साधन देण्यात आले नाही. मुंबई , पुणे, इंदौर अशा मोठया शहरातून आलेल्या गाडीचे नंबर,चालकाचा मोबाईल क्रमांक,गाडीमध्ये लहाण मुले, पुरुष , स्त्री अशी संख्या नोंद करुन गाडीच्या चालकास कोव्हिड केअर सेंटरकडे जाण्यास सांगण्याचे काम शिक्षकांना देण्यात आले.

बाहेरुन येणाऱ्या  गाडया तपासणी करत असताना गाडी चालक आपली गाडी बंद न करताच तो थांबलेला असतो त्यामुळे शिक्षकांना जवळ जाऊन त्यास प्रश्न विचारावे लागते त्यामुळे हेवेतून संपर्क होण्याची शक्यता नाकारता येत नाही तर कित्येक गाडया रेडझोन मधुन येत असल्याने शिक्षकांच्या जीवालाही धोका निर्माण झाला आहे.

दि. २५ रोजी सायंकाळी ७ वाजेपर्यंत १८ गाडया आल्याची नोंद असुन या सर्वांनाच तपासणी केंद्राकडे जाण्यास सांगितल्याचे शिक्षकाने सांगितले. सेफ्टी किट उपलब्ध नसल्याने एका शिक्षकाने तर चक्क सुरक्षेचा उपाय म्हणुन हेल्मेटच घातलेले दिसत आहे.

……………………………………

शिक्षक कोणत्याही कामास सदैव तयार पण सुविधा पुरवा

निवडणूकीचे काम असो की जगनणनेचे काम शिक्षक कोणत्याही कामाला सदैव तयार असतो . प्रशासनाकडुन कोरोनाच्या डयुटी लावलेली आहे यात शिक्षकांना कोणतीच सेफ्टी सुविधा दिली गेली नाही. कोणत्याच मार्गदर्शक सुचना नाहीत, प्रशासनाचे नियोजन नाही, शिक्षक अनेक समस्यावर मात करुन ही डयुटी करत आहे यात शिक्षकास कोरोना झाल्यास प्रशासन जबाबदार आहे का ? कामाला कधीच आम्ही ना म्हणत नाही पण शिक्षकांचेही म्हणणे प्रशासनाने ऐकायला पाहिजे.

प्रताप चौधरी
शिक्षक, मुखेड