नांदेड : ताजी बातमी ; आज सहा कोरोना रुग्ण वाढले ; रुग्णसंख्या झाली 133 , माहुर,किनवट तालुक्यात प्रत्येकी एक रुग्ण

ठळक घडामोडी नांदेडच्या बातम्या

नांदेड  : नांदेड शहरात आज दि. 25 रोजी रात्री आलेल्या अहवालात प्राप्त झालेल्या 96 अहवालापैकी 84 रुग्णांचा निगेटिव्ह अहवाल प्राप्त अजुन 6 रुग्णांची कोरोना टेस्ट पॉजिटिव्ह आली आहे तर जिल्हयात एकुण 133 कोरोना रुग्णसंख्या झाली आहे.

आज प्राप्त झालेल्या 6 पॉजिटिव्ह रु ग्णांपैकी इतवारा भागातील दोन रु ग्ण या ( दोन पुरु ष वय 27 व 32 वर्ष ) व आनंद कॉलनी, जिजामाता कॉलनी येथील एक रु ग्ण (एक पुरु ष व 80 वर्ष ) मिल्लत नगर येथील एक पुरु ष वय 55 वर्ष, वडसा तालुका माहूर येथील एक रु ग्ण वय 17 वर्ष व दहेली तांडा तालुका किनवट येथील एक रु ग्ण वय 29 वर्षे या सर्व रु ग्णावर औषध उपचार सुरू असून त्यांची प्रकृती सद्यस्थितीत स्थिर आहे.

 

आज दिनांक 25 रोजी  एनआरआय यात्री निवास कोव्हिड सेंटर येथील चार रु ग्ण बरे झाल्यामुळे त्यांना रु ग्णालयातून सुटी देण्यात आलेली आहे आतापर्यंत 133 पॉजिटिव्ह रु ग्णांपैकी 63 रु ग्णांना रु ग्णालयातून सुटी देण्यात आलेली आहे व ऊर्वरित 63 रु ग्णावर औषधोपचार चालू असून  एक  पुरुष  व एक  स्त्री  यांची  प्रकृती  गंभीर  आहे  तर  मृत्यू  झालेल्या  रुग्णांची  संख्या  7 झाली असल्याचे  जिल्हा  शल्य  चिकित्सक डॉ  निळकंठ  भोसीकर  यांनी  प्रसिद्धी पत्रकाद्वारे  सांगितले .