नागठाणा येथील शिवाचाऱ्यांची निर्घृण हत्या करणाऱ्या आरोपीस फाशी द्या – बसव ब्रिगेड

ठळक घडामोडी नांदेड जिल्हा

नागठाणा येथील शिवाचाऱ्यांची निर्घृण हत्या झाली त्यातील आरोपीस फाशी द्यावी तसेच या प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी.

हत्ये मागे कोणते कट कारस्थान तर नाही.. सदर खटला जलद न्यायलायात सादर करून आरोपीस फाशी द्यावी अन्यथा तीव्र आंदोलन केले जाईल.

या मागणीचे निवेदन नांदेड निवासी जिल्हाधिकारी डॉ.सचिन खल्लाळ यांना देण्यात आले.
बसव ब्रिगेडचे अध्यक्ष adv.अविनाश भोसीकर,अखिल भारतीय वीरशैव लिंगायत महासंघाचे सचिव वैजनाथ स्वामी,वीरशैव सभेचे विपुल मोकले,पिंटू अप्पा बोंबले,माधव मोरे,संदीप जाधव,सूरज शेटे हे उपस्थित होते. वेगवेगळ्या संघटनेने एकत्रितपणे या मागणीचे निवेदन निवासी जिल्हाधिकारी यांचेकडे दिले आहे.