मुखेडात आज पासुन तिन दिवस जनता कर्फ्यु व्यापा-यांनी स्वंयस्फुर्तीने पुकारले बंद

नांदेड जिल्हा मुखेड

मुखेड / संदिप पिल्लेवाड

शनिवारी दि. २३ रोजी मुखेड कोरोना रुग्णालयातील एक डाॅक्टर व एक नर्स चा अहवाल कोरोना बाधीत आल्याने शहरात भीतीचे वातावरण निर्माण झाले. त्यामुळे कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी शहरातील सर्व छोटे मोठे व्यापारी, सामाजिक संघटना, सामाजिक कार्यकर्ते व पत्रकार यांनी सर्वानी मिळुन शहरात जनता कर्फ्यु लावुन मुखेड शहर कडकडीत बंद करण्याची मागणी सोशल मिडीयाच्या व्हॉटसअपच्या माध्यमातुन प्रशासनाकडे केली होती.
या मागणीची प्रशासनाने दखल घेत काल सायंकाळी आ. डाॅ.तुषार राठोड यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेऊन मुखेड शहरात सोमवार ते बुधवार असा तीन दिवसाचा जनता कर्फ्यु लावुन मुखेड शहर कडकडीत बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला. यावेळी मेडीकल व हाॅस्पीटल वगळता सर्व दुकाने बंद रहातील असेही सांगण्यात आले.
शहरात मध्यठिकाणी असलेल्या उपजिल्हा रुग्णालयात कोरोना रुग्णालयाची स्थापना करण्यात आल्याने शहरातील नागरिकांत भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. कोरोना व्यतिरिक्त सामान्य रुग्णांंची गैरसोय होत असल्याने तालुक्यातील नागरिक त्रस्त झाले. आ.तुषार राठोड यांनी सामान्य रुग्णालय शहरातील ईतर शासकीय ईमारतीत हलवण्याचे प्रयत्न करीन असेही आश्वासन दिले. जर हे सामान्य रुग्णालय स्थलांतरीत करण्यात आले तर सामान्य रुग्णाची होणारी होळसांड थांबेल व कोरोना विषाणुचा संसर्ग थांबण्यास मोठी मदत होईल.
कोरोनाने मुखेड शहरात शिरकाव केल्याने नागरिकांत चांगलीच भिती निर्माण झाली आहे. तब्बल दोन महीन्यानंतर सुरु झालेले मार्केट. या कोरोना मुळे पुन्हा बंद करावे लागत असल्याने व्यापा-यांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले आहे.

…………….

माझे नाव सिराज शेख रा.चांडोळा माझे शहरात मेन रोडला चप्पलचे दुकान आहे. ते दुकान मी दिवाळी पासुन भाड्याने घेऊन चालवत आहे पण कोरोना विषाणुमुळे देशात दि. २२ मार्च पासुन लाॅकडाऊन असल्याने पुर्ण मार्केटच बंद आहे. आमच्यासारख्या छोट्या व्यापा-यांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले आहे. आता भाडे देने पण आमच्यासाठी मुश्कील झाले आहे. शासनाने आम्हा छोट्या व्यापा-यांकडे लक्ष देऊन आर्थिक मदत करावे व ईद निमित्त आमचा भारत देश लवकरात लवकर कोरोनाच्या संकटातुन बाहेर पडावा अशी प्रार्थना देवाकडे आम्ही करत आहोत. सर्व व्यापा-यांनी मिळुन घेतलेल्या निर्णयाला आमचा पाठींबा असुन जनतेने सहकार्य करावे व मुस्लीम बांधवानी घरीच राहुन ईद साजरी करावे. ईद निमित्त सर्वांना शुभेच्छा….
— सिराज शेख
(कीरकोळ चप्पल व्यापारी )