धक्कादायक…! मराठवाड्यातील एका मंत्र्याला कोरोनाची लागण काही दिवसांपुर्वी या मंत्र्यांचा ड्रायव्हर हा पॉझिटिव्ह आढळून आला होता.

ठळक घडामोडी महाराष्ट्र

 

नांदेड: कोरोना व्हायरसने देशभरासह राज्यात मोठा कहर केला आहे. आताच हाती आलेल्या माहितीनुसार महाराष्ट्रातील आणखी एका मंत्र्याला कोरोनाची लागण झाली आहे.

काही दिवसांपुर्वी या मंत्र्यांचा ड्रायव्हर हा पॉझिटिव्ह आढळून आला होता. त्यावरून या मंत्र्याची सुद्धा कोरोना तपासणी करण्यात आली होती. आज या मंत्र्याचे तपासणी अहवाल प्राप्त झाले आहे. त्यात त्यांना कोरोनाची लागण झाल्याचं स्पष्ट झालं आहे.

यापुर्वी राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांना कोरोनाची लागण झाली होती. आणि आता परत एकदा एका नवीन मंत्र्याचा कोरोना तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आल्यानं सगळीकडे खळबळ उडाली आहे. दरम्यान सदरील मंत्र्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. तसेच संपर्कात आलेल्या कुटुंबातील व्यक्तींसह इतरांची तपासणी करण्यात येत आहे.