मुखेड कोव्हिड रुग्णालयातून ७२ अहवाल प्रतिक्षेत ; स्वयंस्फूर्तीने बाजारपेठ बंद पॉझिटिव्ह वैद्यकिय अधिका­ऱ्याच्या संपर्कात आलेले वैद्यकिय अधिकारीही क्वारंटाईन

ठळक घडामोडी नांदेड जिल्हा मुखेड

मुखेड : ज्ञानेश्वर  डोईजड

मुखेड उपजिल्हा रुग्णालय येथील एका वैद्यकिय अधिकाऱ्याचा व परिचारीकेचा कोरोना अहवाल दि. २३ मे २०२० रोजी पॉझिटिव्ह आला होता त्यांच्या संपर्कात आलेले ७२ जनांचे स्वॅब घेऊन लॅबला पाठविण्यात आले असुन त्या अहवालाकाडे संपुर्ण जनतेचे लक्ष लागले आहे.

 

कोरोना पॉझिटिव्ह आलेल्या वैद्यकिय अधिकाऱ्याच्या डायरेक्ट संपर्कात आलेले ३२ जन असुन यात काही वैद्यकिय अधिकारी, कर्मचारी  सुध्दा आहेत तर परिचारीकेच्या संपर्कात ८ जन आले असे एकुण ४० जन व इतर ३२ जन असे एकुण ७२ जनांचे अहवाल पाठविण्यात आले आहेत. तर मुखेड  शहरातील स्वयंस्फूर्तीने संपूर्ण बाजारपेठ बंद करण्यात आली  होती. मोंढ्यातील व्यापाऱ्यांनी पुढील पाच दिवस मोंढा  बंद  राहणार  असल्याचे  सांगितले .

कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाच्या संपर्कात तबेला गल्ली, वाल्मिक नगर, गायकवाड गल्ली असा भाग आला होता त्या भागास तहसिलदार काशिनाथ पाटील यांच्या आदेशानुसार कन्टेंनमेंट झोन घोषित करुन सील करण्यात आले आहे या भागाची पाहणी तहसिलदार काशिनाथ पाटील यांच्यासह तालुका आरोग्य अधिकारी डॉ. रमेश गवाले, मुख्याधिकारी त्र्यंबक कांबळे, पोलिस निरीक्षक नरसिंग आकुसकर यांनी पाहणी केली.

कन्टेंनमेंट झोन घोषित केलेल्या भागास नगर परिषदेच्या वतीने दि. २३ रोजी रात्री फवारणी करण्यात आली असुन या भागाचा सर्वे होणार असुन यासाठी ६ टिम नेमण्यात आल्या आहेत. यात आरोग्य सेविका, अंगणवाडी सेविका, शिक्षक असणार आहेत. ही टिम नागरीकांची तपासणी करुन नागरीकांना लक्षणे असल्यास स्वॅब घेऊन आरोग्य विभाग लॅबला पाठविणार आहे. कन्टेंनमेंट झोन संपुर्ण भाग सील केल्याने नागरीकांतही भितीचे वातावरण आहे.

………………………………………………….

    कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आलेल्या पाचही रुग्णांची प्रकृती स्थिर असुन त्यांचा दहा दिवसानंतर अहवाल पाठविण्यात येणार आहे. तर कोरोना पॉझिटिव्ह आलेली परिचारीका ही बाऱ्हाळी येथील असुन त्या गावाशी कसल्याच प्रकारचा संबंध आला नसल्याचे आरोग्य विभागाच्या वतीने सांगण्यात आले आहे.