नांदेड : ताजी बातमी ; अजुन दोन कोरोना रुग्णात भर ; रुग्णसंख्या झाली 127

ठळक घडामोडी नांदेड जिल्हा मुखेड

           नांदेड : शहरात आज दि. 24 रोजी रात्री आलेल्या अहवालानुसार  अजुन दोन रुग्णांची भर पडली असुन जिल्हयात एकुण 127 कोरोना रुग्णसंख्या झाली आहे.

प्राप्त झालेल्या अहवालात शिवाजी नगर येथील एक रुग्ण व विवेक नगर येथील एक रुग्ण सापडलेला आहे. या रुग्णात दोन्ही पुरुष असुन 61 व 40 वर्षाचे आहेत. या रुग्णांची प्रकृती स्थिर असुन आज 4 रुग्ण बरे सुध्दा झाले आहेत. त्यामुळे त्यांना रुग्णालयातून त्यांना सुट्टदी सुध्दा देण्यात आली आहे.

आतापर्यंत 127 पॉजिटिव्ह रुग्णापैकी 59 रुग्णांना सुट्टी देण्यात आली असुन 62 रुग्णावर उपचार सुरु आहेत. तर 127 पैकी 6 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.