बाराहाळी येथे रामदास पाटील मित्र परिवाराच्या वतीने मुस्लिम बांधवांना–शिरखुम्बा साहित्यासाठी किट वाटप

नांदेड जिल्हा मुखेड

बाराहाळी  : पवन  क्यादरकुंटे

कोरोना महामारीमुळे देश परदेशात हौदोस घातला आहे, या संसर्गजन्य विषाणू चा फैलाव होऊ नये म्हणून भारत सरकारने लॉकडाउन करण्यात आले आहे ,या काळात मोल मजुरी करणाऱ्या लोकांना संकटांना तोंड द्यावे लागत आहे, रमजान हा मुस्लिम समाजातील पवित्र सण म्हणून ओळखला जातो याचं पार्श्वभूमीवर गोर गरीब,गरजू मुस्लिम बांधवांना या पवित्र सणासाठी सिरखुम्बा बनवण्यासाठी सर्व साहित्य ,व अन्न धान्य हिंगोली जिल्ह्यातील मुख्य कार्यकारी अधिकारी रामदास पाटील सुमठानकर मित्र परिवाराच्या वतीने वाटप करण्यात आले .

 

त्यावेळी ईसाक तांबोळी, हाणमंत मामा वाडीकर,झाकीर शेख, अनतेश्वर कोल्हेवाड, पत्रकार तय्यब तांबोळीवडगाव कर,शिवराज विजापूरे,नरशिंग अस्वले, संपत गायकवाड, व्यंकट पाटील उमाटे आदी कार्यकर्ते उपस्थित होते.