बेटमोगरा गावातील नागरिकांच्या मदतीला धावले बेटमोगरेकर …..  माजी आ.हणमंतराव पाटील बेटमोगरेकर यांच्या कडून एक हजार धान्य किटचे वाटप

नांदेड जिल्हा मुखेड

मुखेड  : ज्ञानेश्वर  डोईजड 

लॉकडाऊनमुळे गोरगरिबांच्या दुर्दशा अन मुस्लिम समाज बांधवांच्या पवित्र रमजान महिना सुरू तर रमजान ईदवर कोरोनाचे सावट अशा परिस्थितीत माजी आ. हाणमंतराव पाटील बेटमोगरेकर यांनी  मुस्लिम बांधवांना ईदनिमित्त अन्नधान्य, किराणा,शिरखुर्माचे साहित्य वाटप केले .

 

जिल्ह्याचे पालकमंत्री अशोकरावजी चव्हाण यांनी जिल्ह्यातील कोणत्याही नागरिकांची उपासमार होणार नाही याबाबत काळजी घेण्याबाबतची सूचना केली होती.अशा कोरोनाच्या संकटकालीन परिस्थितीत  बेटमोगरा येथील मुस्लिम समाजासह इतरही समाजातील सर्व गोरगरीब   हातावर पोट असणाऱ्यां गरजू जनतेला जीवनावश्यक वस्तूंच्या एक हजार किट वाटप करून  बेटमोगरेकर यांनी  मदतीचा हात  दिला  आहे .

बेटमोगरा येथील लोकांच्या सुखदुःखात नेहमी सहभागी होणारे माजी आमदार हणमंतराव पाटील बेटमोगरेकर यांनी या कोरोनाच्या काळातही विविध माध्यमातून जनतेची सेवा करण्यात पुढाकार घेतला आहे. बँकेच्या कामानिमित्त येणाऱ्या लोकांना निवाऱ्याची व भोजनाची सोय करणे, पानपोई उभारणे, तसेच अनेक समाजातील गरजू लोकांना आर्थिक व अन्नधान्य देऊन केलेली मदत लोकांच्या कायम लक्षात राहण्यासारखी असून बेटमोगरा गावातील नागरिकांच्या मदतीला धावले शेवटी बेटमोगरेकर असेच  म्हणावे  लागेल .


यावेळी माजी आ. हाणमंतराव पाटील बेटमोगरेकर यांच्यासह  खुशाल पाटील, दत्ता रामचंद्र पाटील, चिनू पाटील, वैजनाथ पाटील, अभिजित पाटील,विजय पाटील, शेख अब्दूल वाहेद, शिवा बाऱ्हाळे, मष्णा देसाई, शेख नयुम, महाजन ढेकळे, मारोती मादाळे, रफीक दफेदार, बळीराम नवलेकर आदी उपस्थित होते.