उमरी ( नागठाण ) शिवाचार्य हत्याकांडातील आरोपीस तेलंगणातुन अटक महाराष्ट्र व तेलंगणा पोलिसांची संयुक्त कामगिरी

ठळक घडामोडी महाराष्ट्र राष्ट्रीय

नांदेड : वैजनाथ स्वामी

उमरी तालुक्यातील नागठाण येथील शिवाचार्य व अन्य एकाच्या हत्याकांड प्रकरणातील आरोपी आपल्या मावशीकडे सापडला असुन आरोपीला तेलंगणातील तानुर येथे अटक केली असून या अटकेत महाराष्ट्र व तेलंगणा पोलिसांनी संयुक्त कामगिरी केली आहे .

बालतपस्वी निर्वानरुद्र पशुपतींची शनिवारी मध्यरात्री हत्या झाल्याने देशात खळबळ उडाली होती तर पालघर घटनेनंतर पुन्हा एकदा शिवाचार्याची हत्या झाल्याने सरकारसहित पोलीस यंत्रणा हादरली पण पोलिसांनी आपले चक्र जलदगतीने फिरवून आरोपीस तेलंगनातून अटक केली.

आरोपीचे नाव साईनाथ लंगोटे आहे तो गावातीलच असून कधीकधी महाराजांच्या गाडीवर ड्रायव्हर म्हणून येत होता. महाराजांच्या डोळ्यात मिरची पूड टाकून त्यांची हत्या करण्यात आलेली आहे कार घेऊन जात असताना भिंतीवर धडकल्याने तो गाडी सोडून स्वतःच्या दुचाकीने पळून गेला होता.

आरोपीस अटक केल्यानंतर सोबत एक दुचाकी सापडली असून यात अन्य कोणी आरोपी आहे का यायाबत आरोपीची चौकशी चालू असल्याचे समजते .

पोलीसांनी आरोपीस तात्काळ अटक केल्याने पोलिसांच्या कार्याचेही कौतुक केल्या जात आहे. तर मराठवाड्यातून अनेक शिवाचार्य तसेच जिल्ह्यातील राजकीय, सामाजिक मंडळी आणि भक्त लोकांचा मोठा जमाव उपस्थित होता..

आरोपीस अटक होत नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही असा पवित्रा गावकऱ्यांनी घेतला होता. आरोपीस अटक केल्यानंतर त्या आरोपीस आमच्या ताब्यात द्या आम्ही त्याला शिक्षा देऊ असे गावकऱ्यांनी जोर धरला होता.