उमरी येथील साधुच्या हत्येप्रकरणी आरोपीस तात्काळ अटक करुन राज्य शासन कठोर शिक्षा  करेल – गृहमंत्री अनिल देशमुख …. लोकभारत न्युजचे सहसंपादक वैजनाथ स्वामी यांना दिले फोनवरुन आश्वासन …साधु – संत संरक्षण कायदयाचीही केली स्वामी यांनी मागणी

ठळक घडामोडी महाराष्ट्र राष्ट्रीय

नांदेड : ज्ञानेश्वर  डोईजड

नांदेड जिल्हयातील उमरी येथील नागठाण मठात श्री.ष.ब्र.108 सदगुरु निर्वाणरुद्र पशुपती शिवाचार्य गुरुमाऊली नागठाणकर यांची झालेली हत्या अत्यंत निंदनीय असुन याप्रकरणी आरोपीस तात्काळ अटक करुन कठोरात कठोर शिक्षा राज्य शासन करेल असे महाराष्ट्र राज्य गृहमंत्री अनिल देशमुख यांनी लोकभारत न्युजचे सहसंपादक तथा विरशैव समाजाचे राष्ट्रीय प्रवक्ते वैजनाथ स्वामी यांना फोनवर चर्चेदरम्यान आश्वासन दिले.

पालघर येथील हत्याकांड नंतर उमरी येथे साधुंची हत्या हे संताच्या भूमिला अशोभनीय असुन विरशैव लिंगायत समाजात संतापाची लाट आहे. उमरी हत्याकांड प्रकरणी आरोपी अजुनही सापडलेले नसुन त्यांना शोधुन कठोर कार्यवाही करावी तसेच संताच्याच भूमित साधु सुरक्षित नाहीत यामुळे साधु संतांना त्यांच्या संरक्षणासाठी साधु संत कायदयाची रचना करुन ती अंमलात आणावी अशी मागणी सुध्दा वैजनाथ स्वामी यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याकडे केली आहे.


गृहमंत्री अनिल देशमुख यांचा समाज  बांधवांस  संदेश 

या  प्ररकणी जो कोणी दोषी असेल त्या कठोरात कठोर शिक्षा सरकार करेल त्यामुळे समाज बांधवांनी निश्चिन्त रहावे असे समाज बांधवाला संदेश देत राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी म्हटले आहे.