“हम नही सुधरेंगे’ बाराहाळी मध्ये सोशल डिस्टन्सिंगचे तीन-तेरा… प्रशासनाने लक्ष देण्याची गरज…

नांदेड जिल्हा मुखेड

बाराहाळी: पवन कँदरकुंठे

मुखेड तालुक्यातील बाराहाळी येथे प्रत्यक्षात पाहता सोशल डिस्टन्सिंगचे तिन तेरा वाजल्याचे चित्र दिसत आहे. या ठिकाणी सर्व नियम मोडत शेकडो नागरिक एकत्र आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

कोराणाच्या प्राश्वभुमीवर संपूर्ण देशात लाँकडाऊन करण्यात आले आहे. वारंवार प्रशासन नियमांचे काटेकोर पणे पालन करण्याचे आवाहन करत आहे. मात्र काही ठिकाणी लोक नियमांचे पालन करताना दिसत नाही. या ठिकाणी सर्व नियम मोडत शेकडो लोक एकत्र आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या ठिकाणी नागरीक व भाजीविक्रेते तसेच किराणा दुकानदार बेजबाबदार पने वागत सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचे उल्लंघन करत मोठी गर्दी करत आहेत. सोशल डिस्टन्सिंग पाळण्यासाठी किराणा-मेडीकल तसेच ईतर ठिकाणी वर्तुळ आखणे बंधनकारक असताना सुद्धा असे कुठेही वर्तुळ काढल्याचे दिसत नव्हते.

सध्या मुखेड तालुक्यांमध्ये दोन ते तीन कोरोना पाँझिटीव्ह रूग्न सापडले असून आपल्या नांदेड जिल्ह्यात सुद्धा दिवसेंदिवस रूग्न वाढतच असून, अजुन याला नागरिक खतपाणी घालत असल्याचे सध्या तरी दिसत आहे.


सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचे उल्लंघन होणार्या अशा ठिकाणी प्रशासनाने वेळीच लक्ष घालून नियम तोडणाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी आता जनतेतून जोर धरत आहे.