मुखेड उपजिल्हा रुग्णालयातील डॉक्टर्स व नर्सचा अहवाल कोरोना पॉजीटिव्ह ; आरोग्य  यंत्रणेत  मोठी  खळबळ ; आज  एकूण ६ पॉजीटिव्ह रुग्ण ; रुग्णसंख्या  १२५ वर

ठळक घडामोडी नांदेड जिल्हा

मुखेड  : ज्ञानेश्वर डोईजड  

मुखेड उपजिल्हा रुग्णालयातील डॉक्टर्स व नर्सचा अहवाल दि .२३ रोजी  कोरोना पॉजीटिव्ह आला  आहे . आज जिल्ह्यात  एकूण ६ पॉजीटिव्ह रुग्ण आले असून  एकूण जिल्ह्याची संख्या  १२५ झाली  आहे .

जिल्ह्यातील ६ पॉझिटिव्ह रुग्णापैकी करबला येथील २ रुग्ण (एक पुरुष वय ३८ वर्ष एक स्त्री वय ६ वर्ष), कुंभारटेकडी येथील २ रुग्ण (एक पुरुष वय १५ वर्ष व एक स्त्री वय ३८ वर्ष) तर दोन मुखेड येथील उपजिल्हा रुग्णालयातील एक डॉक्टर व एक नर्स आहेत.

मुखेड उपजिल्हा रुग्णालयातील  अहवाल  पॉजिटिव आल्याने एकच खळबळ उडाली आहे यामुळे संपूर्ण आरोग्य यंत्रणेत  खळबळ आहे .