डॉ.सौ.मीनलताई पाटील खतगावकर यांच्या वाढदिवसानिमित्त बारूळ येथे डॉक्टर व नर्स यांचे स्वागत करत पुष्पवृष्टी करण्यात आली आणि रुग्णांना फळ वाटप

नांदेड जिल्हा नांदेडच्या बातम्या

 

नांदेड :  जिल्ह्याच्या लोकप्रिय नेते डॉ.सौ.मीनलताई पाटील खतगावकर यांच्या वाढदिवसानिमित्य
बारुळ येथे प्राथमिक आरोग्य केंद्र या ठिकाणी रुग्णांना फळे वाटप करण्यात आले तसेच करोना या महामारीत अतिशय महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या डॉक्टर नर्स,पोलीस कर्मचारी,आणि सफाई कर्मचारी हे महत्त्वाची भूमिका बजावत आहे.तर या सर्व लोकांचा गौरव झाला पाहिजे या अनुषंगाने येथील बबलू शेख बारुळकर यांच्या आयोजनातून बारुळ येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील आरोग्य अधिकारी तसेच सर्व कर्मचारी वर्ग यांचा सन्मान झाला पाहिजे या उद्देशाने त्यांचा सत्कार व पुष्पवृष्टी ने त्यांचे स्वागत करण्यात आले, सदरील कार्यक्रमाच्या ठिकाणी अध्यक्ष म्हणून संत नामदेव महाराज मठ संस्थानचे मठाधिपती परमपूज्य नामदेव महाराज बबलूकर यांची उपस्थिती होती,तर कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुणे म्हणून बालासाहेब पाटील जाधव ,एस पी जाधव ,नारायण सावकार कुंभारे, योगेश पाटील
नंदनवनकर उपसरपंच सुरेश रहाटे, इस्राईल पठाण, हनमंत पाटील कदम ,बबु महाराज,इब्राहिम शेख, युनूस शेख,ओम लाला ठाकूर ,वैद्यकीय अधिकारी डॉक्टर सौ. गोरे मॅडम सुपरवायझर बालाजी गलशेतवाड यांच्यासह सर्व कर्मचारी वर्ग उपस्थित होता.