केशकर्तनालय / सलूनची दुकाने सुरु ठेवण्याकरिता अटी व शर्ती…पहा काय आहेत अटी  

ठळक घडामोडी

नांदेड :

* दुकानाच्या दर्शनी भागात ग्राहकाने स्वतःचा टॉवेल सोबत आणण्याबाबतचा फलक लावावा तसेच जो ग्राहक स्वतःची टॉवेल आणणार नाही त्यांना दुकानात प्रवेश देऊ नये.
* कोणत्याही परिस्थितीत एका ग्राहकास वापरलेला टावेल /  कापड इतर ग्राहका करिता वापरू नये.
*  दुकान उघडल्यानंतर तसेच प्रत्येक ग्राहकाच्या वापरानंतर बैठक व्यवस्था व अवजाराचे निर्जंतुकीकरण करणे बंधनकारक राहील.
*  केसकर्तनालय दुकानांमध्ये प्रतिक्षेवर जागेची उपलब्धता लक्षात घेता जास्तीत जास्त ग्राहक व्यक्तींना दुकानात थांबविण्याची व्यवस्था करावी.
* येणाऱ्या प्रत्येक ग्राहकासाठी स्वतंत्र टॉवेल , ब्लेड व वारंवार वापरण्यात येणारे इतर साहित्य व स्वतंत्र संपूर्ण निर्जंतुकीकरण करून वापरावे.
*  सेवा देणारा व सेवा घेणारा सोडून इतर व्यक्ती मध्ये तीन फुटाचे अंतर ठेवणे बंधनकारक राहील.
*  मास रुमाल नाका तोंडाला झाकून ठेवील अशा प्रकारचे असणे आवश्यक आहे तसेच दुकानांमध्ये सेनीटायझर, हँडवॉश, साबण, हात धुण्याचे साहित्य ठेवणे बंधनकारक राहील.
* प्रत्येक भागाचे केस कर्तन केल्यानंतर रिकाम्या खुर्चीचे निर्जंतुकीकरण करण्यात यावे.
* ग्राहकांना केवळ Appoitment घेऊन येण्यास कळवावे व ग्राहक विनाकारण दुकानांमध्ये वाट पाहत राहणार नाही याची सलून मालकांनी दक्षता घ्यावी .
वरील अटींचे उल्लंघन केल्यास दंडात्मक कायदेशीर कारवाई करून दिलेली मुभा  रद्द करण्यात येईल कायदेशीर व दंडात्मक कारवाई करण्यास महानगरपालिका हद्दीत नगरपालिका व पोलिस विभाग यांनी संयुक्तपणे गठित करावी , नगरपालिका हद्दीत नगरपालिका व पोलिस विभाग यांनी संयुक्त पथके गठित करावी तर गाव पातळीवर ग्रामपंचायत व पोलिस विभागाचे संयुक्त पथक गठित करावेत वरील आदेशाचे पालन न करणाऱ्या कोणती व्यक्ती संस्था अथवा समूह रोग प्रतिबंधक कायदा 1897 आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 आणि भारतीय दंड संहिता 188 नुसार शिक्षेस पात्र असलेला अपराध केला असे मानण्यात येईल व कारवाई करण्यात येईल असे जिल्हाधिकारी डॉक्टर विपिन ईटणकर यांनी  काढलेल्या आदेशात म्हटले आहे