कोरोनाच्या संकट काळात राज्य सरकारच्या अपयशाचा पाढा ; भाजपा… मुखेडमध्ये ‘महाराष्ट्र बचाओ आंदोलन…

नांदेड जिल्हा मुखेड

बाराहाळी: पवन कँदरकुंठे

भारतीय जनता पार्टीच्या वतीने आज राज्यव्यापी आंदोलन करण्यात आले. मुखेड येथील कार्यकारणीनेही सहभाग घेतला असून ‘आंगण ते रणांगण’ शिर्षकाखाली राज्यातील अनेक भाजपा नेते आणि कार्यकर्ते आंदोलनात सहभागी  झाले .

“उद्धवा… अजब तुझे निष्फळ सरकार”
महाराष्ट्राची जनता मरणाच्या दारात…
उद्धव सरकार मात्र आपल्या घरात…!

कोरोनाविषाणूचा प्रसार रोखण्यासाठी राज्य सरकार अपयशी ठरल्यामुळे राज्य सरकारचा निषेध करून, सरकारला जाब विचारण्यासाठी लॉकडाऊनचे सर्व नियम काटेकोरपणे पाळून महाराष्ट्र बचाव आंदोलन करण्यात आले.

महाविकास आघाडी सरकारच्या विरोधात आज भाजपाच्या वतीने आंदोलन करण्यात आले असून आंगण ते रणांगण अशा शिर्षकाखाली राज्यातील अनेक भाजपा नेते आणि कार्यकर्ते आंदोलन केले आहेत.

राज्यात कोरोना संक्रमितांची वाढती संख्या, आरोग्य व्यवस्थेचा उडलेला बोजावारा, कापूस उत्पादकांना योग्य तो दर दिला जावा असे मजकूर असलेले फलक हातात घेवून पक्षातील पदाधिकारी व काय्रकर्ते सरकार विरोधात आज भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र आयोजित महाराष्ट्र बचाओ आंदोलनात सहभागी  झाले .

यावेळी आमदार डॉ तुषार राठोड , जिल्हा उपाध्यक्ष माधव पाटील उच्चेकर,भाजपा तालुकाध्यक्ष डॉ. वीरभद्र हिमगिरे, सरचिटणीस किशोर सिंह चौहान, सुधीर चव्हाण, साईनाथ बुद्धेवार आदीसह महाविकास आघाडी सरकारचा जाहीर निषेध केला.