एकीकडे भाजपचे आंदोलन होत असताना दुसरीकडे नांदेड जिल्ह्यात दिव्यांगांचे न्याय हक्कासाठी घरोघरी उपोषण

नांदेड जिल्हा नांदेडच्या बातम्या

नांदेड : जिल्ह्यात दिनांक 22  मे 2020 रोजी दिव्यांग बांधवांच्या अनेक प्रश्नासाठी शासन प्रशासनास जागे करण्यासाठी दिव्यांग वृन्द निराधार मित्र मंडळ महाराष्ट्र संस्थापक अध्यक्ष चंपतराव डाकोरे पाटील उंचीलिकर यांच्या नेतृत्वाखाली दिव्यांग बांधवांच्या प्रश्नाकडे लक्ष लोकप्रतिनिधी शासन-प्रशासन यांचे लक्ष वेधण्यासाठी दिव्यांग बांधवानी नांदेड जिल्ह्यात एकाच दिवशी संपूर्ण जिल्ह्यात 1000 दिव्यांग बांधवांनी या उपोषणात सहभाग नोंदवला व शासन लोकप्रतिनिधी यांच्याकडे मोबाईलवर निवेदन फोटो पाठवून आमच्या सवलती आमचा हक्क 2016 च्या कायद्याची कट्टूर पुणे अंमलबजावणी करावी व दिव्यांग बांधवांचा अंत पाहू नये दिव्यांग होने का गम नही हम किसीसे कम नही हे वाक्य आज लोकप्रतिनिधी शासन प्रशासन यांना दाखवून दिले

मला माहित नाही कारण आज दिव्यांग बांधवांना उपोषण करावे किंवा आपला हक्कासाठी लढाई करावी यासाठी फक्त मोबाईल फोन वर मेसेज गेल्यामुळे एवढ्या मोठ्या संख्येने दिव्यांग बांधवांनी आपला रोष व्यक्त केला आज शासन कोणतेही शिबीर घ्यायचे असेल तर हजारो रुपये खर्च करते पण ते दिव्यांगाचे शिबिर यशस्वी होत नाही पण दिव्यांग निराधार मित्र मंडळ महाराष्ट्र संस्थापक अध्यक्ष यांच्या एका मेसेजवर हजारो लोकांनी उपोषण करते म्हणजेच दिव्यांग बांधवांची एकीचे दर्शन आहे.

नांदेड जिल्ह्यातील सोळा तालुक्यातून दिव्यांग बांधव आदिवासी क्षेत्रात माहूर किनवट ते कर्नाटक सीमेवर असलेल्या देगलूर तालुक्यात पर्यंत संपूर्ण जिल्ह्यात संपूर्ण तालुक्यात दिव्यांग बांधवांनी आपल्या शक्तीचे दर्शन घडून दिले व सत्तेत असलेल्या लोकप्रतिनिधीला खासदार आमदार पालकमंत्री यांना विचार करण्याची वेळ आली निवडणुकीमध्ये लाखो करोडो रुपये खर्च करून मते घेताना दिव्यांग बांधवांची आठवण येते आज संकटकाळी नांदेड जिल्ह्यातील एकातरी लोकप्रतिनिधींनी दिव्यांग बांधवांचे सुख दुःखासाठी जागतिक करोणा संकटकाळी धावून आलेला आहेत का ? का बरे आले नाहीत त्याना बुद्धी दिली नाही .

आम्हा दिव्यांग बांधवाचा लोकप्रतीनिधी शासन पानी नये जर दिव्यांग बांधवाना न्याय नाहि मिळाल्यास दिव्या बांधव अनोखे आंदोलन करतील हि वेळ येऊ देऊ नये असे आवाहन संस्थापक अध्यक्ष चंपतराव डाकोरे पाटिल, यांनी केले हे आंदोलन यशस्वी करण्यासाठी ज्ञानेश्वर नवले, राजु शेरकुरवार, तुकाराम जाधव,चादु आंबटवाड, माधव शिंदे, गजानन वंहिदे, राजेंद्र शेळके, प्रेमसिंग चव्हाण, आशा जाधव, ताराबाई मठपती मीनाबाई सुर्यवंशी,बाली जंगेनवाड, यादव फुलारी, पांडुरंग सुर्यवंशी, ईत्यादी कार्यकर्त्यांनी यशस्वी केले