अक्कलकोट मध्येही महाराष्ट्र बचाओ चा नारा

इतर बातम्या

अक्कलकोट : रुद्रय्या स्वामी 

महाराष्ट्रात कोरोनाग्रस्तांचा आकडा ४० हजाराला भिडला असताना. एकट्या मुंबईतला आकडा २५ हजारी ओलांडत आहे. तसेच महाराष्ट्रभर पोलिसांवर हल्ले सुरूच आहेत, रुग्ण पळून जात आहेत, दवाखान्यातील बेडची कमतरता वाढली आहे, रुग्णसंख्या दाबण्याचा प्रकार सुरू आहे. राज्यसरकार कडून विशेष पॅकेज, उपाययोजना होताना दिसत नाहीत. कोरोनाची परिस्थिती हाताळण्यात अपयशी ठरलेल्या ठाकरे सरकारला विरोधक म्हणून जाब विचारण्यासाठी अक्कलकोट तालुका भाजपा तर्फे महाराष्ट्र बचाव आंदोलन करण्यात आले.

यावेळी खासदार श्री.ष.ब्र.डॉ जायसिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामीजी, लोकप्रिय आमदार सचिन दादा कल्याणशेट्टी, तालुका अध्यक्ष मोतीराम राठोड ,मल्लिनाथ स्वामी व पदाधिकारी ,कार्यकर्ते उपस्थित होते.