रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गट यांच्या वतीने अक्कलकोट मध्ये डबरे गल्ली येथे गरजू लोकांना अन्नधान्य वाटप

इतर बातम्या

अक्कलकोट : रुद्रय्या स्वामी 

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गट पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले साहेब यांच्या आदेशाने आणि राज्याचे सरचिटणीस तथा माजी राज्यमंत्री राजाभाऊ सरवदे यांच्या आदेशानुसार रिपाईचे अक्कलकोट तालुका अध्यक्ष अविनाश मडिखांबे यांच्या वतीने अक्कलकोट शहरात प्रभाग क्रमांक सात मधील डबरे गल्ली येथील गोरगरीब गरजू नागरिकांना अन्नधान्याचे वाटप शिवसेना शहरप्रमुख योगेश पवार यांच्या हस्ते वाटप करण्यात आले.

 

यावेळी रिपाइंचे तालुका अध्यक्ष अविनाश मडीखांबे, सचिन विभुते, शुभम मडिखांबे, दत्तात्रय जाधव, पिंटू जाधव, प्रताप यादव, श्रेयश थोरात, राकेश यादव, विरुपक्ष माने,पुट मडिखांबे, बंटी मडिखांबे, वकील मडिखांबे, धनंजय मडिखांबे, उज्वल मडिखांबे, अजय मडिखांबे, रोहित वाघमारे आदी उपस्थित होते.
यावेळी प्रत्येकी गहू, तांदूळ, तुरदाळ, साखर इत्यादी जिवनाश्यक वस्तू वाटप करण्यात आले.

 

त्यामुळे डबरे गल्लीतील सर्व नागरिकांनी अविनाश मडीखांबे यांच्या कार्याचे कौतुकास्पद करून अभिनंदन केले. यावेळी बोलताना शिवसेनेचे शहर प्रमुख योगेश पवार म्हणाले की लॉकडाऊनच्या परिस्थितीत गोरगरिबांची जेवणाची सोय होत नव्हती ते चिंतेत असताना त्यांच्या मदतीला धावून अविनाश मडीखांबे यांनी सर्वाचे पोटभर जेवणाची सोय केल्याने मडिखांबे यांचे अभिनंदन व कौतुक केले.

शेवटी बोलताना रिपाइंचे तालुका अध्यक्ष अविनाश मडीखांबे यांनी म्हणाले की माझ्या हातून जेवढे शक्य होता होईल तेवढे प्रयत्न करुन मी लॉकडाउनच्या परीस्थितीत आपणास मदत करण्याचे आश्वासन दिले व शहरातील दानशुर व्यक्ती व सामाजिक संस्थांनी देखील पुढाकार घेऊन उपासमारीने बेहाल असणाऱ्या कुटुंबांना मदत करण्याचे आवाहन केले आहे.