पंचायत समिती शिक्षण विभागाची ऑनलाइन झूम मिटिंग संपन्न

नांदेड जिल्हा मुखेड

मुखेड : संदिप पिल्लेवाड

सध्या कोरोना विषाणुने सर्वत्र थैमान घातले असुन याचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देश व राज्यातील सर्व यंत्रणा युध्द पातळीवर काम करत आहे. यादरम्यान कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अधिकारी व शिक्षकांना त्यांच्या शैक्षणिक कार्यप्रणाली विषयी व पुढील कार्य करण्याच्या द्रष्टीकोनातुन पंचायत समिती मुखेड गटसाधन केंद्र कार्यालयाच्या वतीने तालुकास्तरीय झुम मीटिंग चे आयोजन करण्यात आले होते. यावेळी शिक्षकांना व्हिडिओ कॉन्फरन्सिंग द्वारे डायटचे प्राचार्य जयश्री आठवले, शिक्षणाधिकारी प्रशांत दिग्रसकर ,अधिव्याख्याता रामकिशन देशमुख,चंद्रकांत धुमाळ यांनी मार्गदर्शन केले.
कोरोनाच्या पार्श्वभुमीवर दि.१८ मे रोजी घेण्यात आलेल्या झुम मीटींग मध्ये भविष्यात राबवण्यात येणाऱ्या बाबीची प्रभावी अंमलबजावणी करण्याच्या द्रष्टीने प्राचार्य जयश्री आठवले, प्रा. देशमुख रामकिशन, प्रा.धुमाळ चंद्रकांत,
व IT सेलचे विषय सहायक संतोष केंद्रे यांनी सगुण विकास, आदर्श शाळा, केंद्रातील एक आदर्श शाळा निवडणे, कल चाचणी व अँड्राईड मोबाईल नसणा-या विद्यार्थांना स्व:ताचे मोबाईल देऊन कल चाचणी घेण्याचे नियोजन करणे, दिक्षा अॅपव्दारे विद्यार्थांना स्वंयशिक्षण देणे, केंद्रातील मातृशाळेला दुस-या दोन कींवा तीन शाळा जोडणे, उपक्रमशिल शाळा, व दिव्यांग विद्यार्थी त्याचबरोबर येत्या शैक्षणिक वर्षात दुबार शाळेचे नियोजन करणे ईत्यादी विषयावर सर्व पर्यवेक्षीय अधिकारी,विस्तार अधिकारी, सर्व केंद्रप्रमुख, विषय साधनव्यक्ती व विशेष शिक्षकांना जिल्हास्तरांवरून सखोल चर्चा व मार्गदर्शन करण्यात आले.
सदर आॅनलाईन झुम बैठक यशस्वितेसाठी,
गटशिक्षणाधिकारी राम भारती यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्षण विस्तार अधिकारी बी.एम. पाटील, एम.बी. बडगीरे, एस .एच जंपलवाड, गजानन होनराव, व्यंकट माकणे सदरील बैठकीचे तंत्र सहायक म्हणून बस्वराज निरणे, श्रीकांत थगनारे, शिवाजी कराळे यांनी परिश्रम घेतले. सदरिल बैठकीचे सुत्रसंचलन के .एन.कांबळे यांनी केले.


विशेष कार्याबद्दल कौतुक

तालुक्यातील तीन उपक्रमशिल शाळेचे लेख राज्यस्तरीय मॅगेझीन मध्ये झळकणार असल्याने जिल्हा कार्यालयाच्या वतीने प्रशंसा केली. व पं.स. मुखेडचे ब्लाॅग निर्मितीतील कार्याबद्दल शिवाजी कराळे यांचेही विशेष कतुक करण्यात आले.