नांदेड : गुरुवारी सहा रुग्ण पॉझिटिव्ह वाढले; एकाचा मृत्यू! – नांदेडच्या गाडीपुरा, मुखेड व बिलोलीतही कोरोनाचा शिरकाव ; मुखेडमध्ये रुग्णांची संख्या वाढली

ठळक घडामोडी नांदेड जिल्हा मुखेड

नांदेड  : दि. २१ मे २०२० रोजी प्राप्त नमुन्यांच्या अहवालां पैकी ०६ नमुने Corona Positive अहवाल आलेला आहे. त्यापैकी २ रुग्ण गाडीपुरा या भागातील असुन डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय रूग्णालयात दाखल करण्यात आले होते, त्यापैकी एका चा उपचारा दरम्यान मृत्यू झालेला आहे, ०१ रुग्ण यात्री निवास, नांदेड येथे दाखल आहे .

तालुक्यातील  रावण कोळा येथील  २ रुग्ण रहिवासी असून उपजिल्हा रुग्णालय मुखेड येथे दाखल आहेत व ०१ केरुर  तालुका बिलोली येथील रहिवासी असून तो बीलोली येथील CCC मध्ये दाखल आहे.

 

या अगोदर  नांदेड ११० कोरोना  रुग्णांची  संख्या  होती  आज  ६ वाढल्याने  ११६ झाली  आहे .