मुक्रमाबाद मध्ये सोशल डिस्टन्सींगचा फज्जा,बँकेतुन पैसे काढण्यास नागरिकांची अलोट गर्दी…

नांदेड जिल्हा मुखेड

मुखेड:पवन कँदरकुंठे

कोरोना व्हायरसच्या थेमानाने देशात व राज्यात लाँकडाऊन सुरू आहे. परिस्थिती बिकट होत असल्याकारणाने आता हे लाँकडाऊन ३१ तारखेपर्यंत वाढवले आहे.

सध्या मुक्रमाबाद परिसरात कोरोना बाधितांची संख्या शुन्य आहे. मात्र संकट अजुन टळले नाही ही बाब नागरिकांनी लक्षात घेणे गरजेचे आहे. विविध योजनेअंतर्गत आपल्या खात्यात जमा झालेले पैसे काढण्यासाठी नागरिकांनी एकच गर्दी केली होती. मुक्रमाबाद मध्ये सोशल डिस्टन्सींगचा प्रत्यक्षात फज्जा ऊडालेला दिसतोय. बँकेमार्फत नागरिकांच्या आरोग्याला लक्षात घेता कोणतीही सुविधा उपलब्ध करुन दिसल्याचे दिसत नाही.

बँकेसमोर कधीही जा अशीच नागरीकांची अलोट गर्दी असते. स्थानिक बँकेने नागरिकांना बसण्यासाठी आणी सावलीची तसेच पाणी पिण्याची सोय केली नाही. तर विशीष्ट अंतरावर उभे राहण्यासाठी खुणा तयार करणे गरजेचे होते. मात्र तसे न करता भर उन्हात नागरिकांना चटके खात ऊभे रहावे लागत आहे.

बँकेने जरी सोशल डिस्टन्सींग करीता खुणा तयार केल्या नसल्या तरी नागरिकांनी हे पाळणे गरजेचे आहे. आता सोशल डिस्टन्सींग कडे स्थानिक प्रशासन गंभीरपणे लक्ष देणार का ? की हा असाच प्रकार पुढे सुद्धा सुरूच राहील ? असा प्रश्न निर्माण झालाय.

—————————————-

सध्या कोरोना विषाणुचे रूग्न झपाट्याने वाढत आहेत. अशात नागरीकांसह प्रशासनाने सुद्धा या बाबींकडे गंभीररित्या लक्ष देण्याची गरज आहे. केंद्र आणि राज्य सरकारने दिलेल्या नियमांचे पालन करणे खुप गरजेचे आहे.