वागदरी येथील ग्राम सुरक्षा दलाचे तहसिलदार अंजली मरोड यांनी केले कौतुक…!

इतर बातम्या महाराष्ट्र

अक्कलकोट : रुद्रय्या स्वामी

कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे शहरी ग्रामीण भाग टप्प झालं असून सध्या ग्रामीण भागात ग्राम सुरक्षा दलाचे उल्लेखनीय ठरत आहे.गेल्या दोन महिन्यापासून वागदरीत बाबासाहेब आंबेडकर चौकात गाव सुरक्षित करण्याची जबाबदारी उत्तम पणे पार पाडत आहेत.अक्कलकोटचे तहसिलदार अंजली मरोड मँडम यांनी वागदरीत
कोविड 19 कोरोना प्रतिबंधक ग्राम सुरक्षा दलास भेट घेऊन चौकशी केली त्याचे कामाचे कौतुक केले.कोविड 19 कोरोना प्रतिबंधक ग्राम सुरक्षा दलात विजयकुमार शिंदे,शरणबसप्पा शिंगे,मल्लिनाथ नडगेरी,चिदानंद परिट,लक्ष्मण माताळे,महादेव सोनकवडे,रामराव सकट,राजकुमार यादव,शिवानंद पूरत व महिला सदस्य ललिता भटारे,गंगूबाई कुंबळे,महानंदा वमने,जगदेवी मुरळी याची भेट घेऊन अडचणी जाणून घेतले
यावेळी तहसिलदार मँडम बोलताना म्हणाले वागदरी येथील कोविड 19 कोरोना प्रतिबंधक ग्राम सुरक्षा दलाचे काम उत्तमपणे चालू आहे.प्रशासन त्याचे दखल घेईल.त्याचे मनोबल व प्रोत्साहन देण्यासाठी भेट घेतली.