ग्रामीण महाविद्यालयात यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाच्या ऑनलाइन तासिका

नांदेड जिल्हा मुखेड

मुखेड : संदीप पिल्लेवाड

यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिक अंतर्गत ग्रामीण (कला, वाणिज्य व विज्ञान) महाविद्यालय, वसंतनगर ता.मुखेडच्या वतीने एम.ए. मराठी च्या विद्यार्थ्यांना मराठी विभाग प्रमुख प्रा. डॉ. पंडित शिंदे यांनी अतिशय नावीन्यपूर्ण लक्षवेधी ऑनलाइन व्याख्यान शाहीर राम जोशी या विषयावर दिनांक 6 मे 2020रोजी दिले तसेच दि 8 मे 2020 रोजी त्यांनीच बहिणाबाईंच्या कविता या विषयावर दुसरे व्याख्यान पुष्प गुंफले.

या दोन्ही व्याख्याना वेळी प्राचार्य डॉ.हरिदास राठोड, बी.के. मोहन (वरिष्ठ शैक्षणिक सल्लागार विभागीय केंद्र नांदेड), श्री सूर्यवंशी सर,श्री पवार सर (विभागीय केंद्र नांदेड) प्रा.संजय पाटील,प्रा. डॉ. राम धारासूरकर, ग्रंथपाल डॉ.क्षीरसागर सूग्रीव,प्रा.कोटुरवार पी.पी.,प्रा. डॉ.रॅपनवाड सर,प्रा. डॉ.कल्याण जी.एस.,प्रा.पवार एस.के.,मोघे मॅडम,प्रा. डॉ. नागोराव आवडे तसेच या केंद्राचे केंद्र संयोजक प्रा. जी.के पांडे हे उपस्थित होते.या ऑनलाईन व्याख्यानास विद्यार्थ्यांनी ही भरभरून प्रतिसाद दिला तसेच अनेक मान्यवरांनी याचा लाभ घेतला.

या आॅनलाईन तासीका प्रस्तुत महाविद्यालयाकडून सूरु असून जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. हरिदास राठोड व या कार्यक्रमाचे आयोजक प्रा. पांडे जी.के. यांनी केले आहे.