लॉकडाऊन संपल्यानंतरच रमजान ईद साजरी करा -एस. के. बबलु ………….  डॉ.ए.पी.जे. अब्दुल कलाम समाज सेवा समितिचे आवाहन   

नांदेड जिल्हा मुखेड

मुखेड  : ज्ञानेश्वर  डोईजड  

पवित्र रमजान ईद हा सर्वात महत्त्वाचा सण पण  कोरोनामुळे देशात  गंभीर परिस्थिती आहे. यामुळे लॉकडाऊन संपल्यानंतरच खरी रमजान ईद साजरी करा असे आवाहन डॉ.ए.पी.जे. अब्दुल कलाम समाज सेवा समिति मूखेड़चे अध्यक्ष,एस.के.बबलु यांनी केले आहे .

 

ईद हा आनंद साजरा करण्याचा सण असला तरी लॉकडाऊन मुळे देशाचा झालेल्या आर्थिक ,नुकसान  , बहुतांश कष्टकरी समाज बांधवांनी त्यांचा बसलेला फटका यामुळे संवेदना म्हणून सर्वांनीच यावर्षी ची ईद कोणताही डामडौल न करता नवीन कपडे सौंदर्य प्रधाने खरेदी न करता अत्यंत साधेपणाने साजरी करावी आणि ज्यांना शक्य असेल त्यांनी इतरांना मदत करावी, त्यातून लॉकडाऊन च्या सर्व नियमाचे पालन  व्हावे आणणे कोरोना चा मुकाबला करण्यासाठी आपले महत्त्वाचे योगदान असावे.

याकरिता समाजामधून प्रयत्न होत आहेत, मुस्लिम धर्मातील महत्त्वाचे सणा पैकी ईद उल फितर म्हणजेच रमजान ईद ही आनंद साजरा करण्याची ईद मानली जाते, सामुदायिक कर्त्या प्रेम व आनंदाने साजरा केला जाणारा सण अशी त्याची ओळख आहे यातील फीतर या शब्दाचां अर्थ दान करणे असा आहे, रमजान महिन्यातील रोजे संपल्यानंतर ईद येते, ईदला नवीन वस्त्र प्रदान करून मुस्लिम बांधव जगावर किंवा मशिदीत नमाज अदा करण्यला जातात ईदचा  उत्सव अवर्णनीय असतो, कुटुंबातील लहान थोर पासून सगळे च्या आनंदात सहभागी होतात, ईद साठी घर सुशोभित केले जाते, मिष्ठान बनविले जातात, शिरखुभा, मिठाई खुलविण्यासाठी. मित्र_नातेवाईकांना आमंत्रण करतात, सामुदायिक मेजवानी होतात, मात्र कोरोना निमित्ताने सध्या सुरू असलेल्या लॉक डाउन मध्ये या सर्व गोष्टीचा परिणाम बदललेला आहे .

गेली दोन महिने बंद असलेल्या शहरातील दुकान हळूहळू उघडत आहेत . बाजार मध्ये गर्दी वाढत चाललेली आहे. कोरोणाचा मुखेड मधे एक रुग्णही  आढळला असून  धोका वाढतच  चाललेला  आहे . त्यामुळे सावधगिरीची सर्वांनच गरज आहे , सण म्हणून आपण या धोक्याकडे दुर्लक्ष केल्यास त्याचा त्रास सर्वांनाच होणार आहे, त्यामुळे कोरोना प्रतिबंदाला गालबोट लागेल अशी कोणतीही गोष्ट होता कामा नये.

समाजात बहुतांश लोक कष्टकरी वर्गातल्या आहेत दोन महिने त्यांच्या हाताला काम नाही त्यामुळे आर्थिक दृष्ट्या ते सण साजरा करू शकणार नाहीत ईदच्या शुभ परवाला गरीब समाज बांधव आनंदापासून वंचित राहत असेल तर ती ईद आनंदाची नाही , असे मानले जाते, समाजातील तळागाळातील व्यक्तीला ईदच्या पावन परवाचा आनंद घेता यावा, यासाठी जकात व फितरची  तरतूद आहे, त्यामुळे ही ईद नेहमीसारखी उत्सवी न करता समाजातील गरजू लोकांना मदतीचा हात देणारी ठरावी असे आवाहनही  डॉ.ए.पी.जे. अब्दुल कलाम समाज सेवा समिति मूखेड़चे अध्यक्ष,एस.के.बबलु यांनी केले आहे .