ईद निमित्त मुस्लीम समाजातील गरीबांना रामदास पाटील सुमठाणकर परिवाराच्या वतीने साहित्य वाटप कोरोनाच्या संकट काळात मुस्लीम बांधवांना आधार

ठळक घडामोडी नांदेड जिल्हा मुखेड
मुखेड : ज्ञानेश्वर  डोईजड
मुस्लीम बांधवांचा रमजान महिना पवित्र मानला जातो. पण कोरोनामुळे अनेक कुटुंबावर संकट कोसळले. मुस्लीम समाजातील अनेकांचे हातावर पोट त्यात या लॉकडाऊनमुळे घरातल्या दारीद्रयामुळे चुलही पेटेना अशा परिस्थितीत रामदास पाटील मित्र परिवाराच्या वतीनेे छोटीशी मदत म्हणुन ईद निमित्त लागणारे साहित्य दि  २० रोजी  वाटप करण्यात आले.

यावेळी धर्मगुरु हाफिज अब्दुल गफार खादरी, मोहम्मद यासीनसाब शेख , शेख ईस्माईल,शेख अतिक, नाजिमपाशा सौदागर, नगरसेवक प्रा.विनोद आडेपवार, शौकत होनवडजर, ज्ञानेश्वर  डोईजड यांची प्रमुख उपस्थिती होती. या किटमध्ये सेमी, साखर, खोबर,खरबुज,टरबुज,चारोळी,डालडा,खिसमिस,खारीक,तांदुळ असे ईद निमित्त लागणारे साहित्य गोर गरीब मुस्लीम बांधवांना देऊन एक छोटीशी मदत देण्याचा प्रयत्न केला.

मुस्लीम बांधवांची बहुतांश परिस्थिती अत्यंत दयनीय असुन त्या अशिक्षीतपणामुळे समाजातील मुख्य प्रवाहाबरोबर येऊ शकले नाहीत. हातावरचे पोट अन लागेल ते काम करुन अनेक नागरीक आपल्या कुटुंबाचा गाडा चालवितात. कोरानाच्या भयंकर संकटाने घरातील उपजिवीकेच्या सहित्याचे होत्याचे नव्हते झाले.

शासनाची ठोस मदत अद्याप त्यांच्यावर पर्यंत पोहचली नाही पण हिंगोली येथे मुख्याधिकारी असलेले रामदास पाटील हे ईद निमित्त दिलेली मदत नक्कीच आधार देईल. या मदतीवेळी बबलु शेख, योगेश पाळेकर, इमरान आत्तार, नितिन टोकलवाड, अफरोज शेख, अमोल घोगरे,विशाल बनसोडे, अनवर मनियार,महेश पाटील,अफान पाशा सौदागर,अदनान पाशा सौदागर,अफरोज शेख यांनी परिश्रम घेतले.