नांदेड : कोरोनाचा आकडा वाढत्या मार्गाने ; चार कोरोना बाधित रुग्ण सापडले : रुग्णांची संख्या झाली ११० वर ; मुखेडच्या  कोव्हीड सेंटर मधून एक 

ठळक घडामोडी नांदेड जिल्हा

नांदेड  : नांदेडमध्ये आज  सायंकाळी प्राप्त झालेल्या अहवालात चार कोरोना रुग्णांची भर पडली असून रुग्णांची संख्या झाली ११० झाली  तर  पहिल्यादांच मुखेडच्या  कोव्हीड सेंटर मधून एक कोरोना  रुग्णाची  नोंद  झाली आहे .

यात सांगवी अंबा नगर येथील कंटेनमेंट झोन मधील एक, भोकर मध्ये एक ,मुखेडच्या  कोव्हीड सेंटर मधून एक तर नांदेड शहरातील अन्य नगरातील एकाचा समावेश आहे .आज कोरोना मुक्त झालेल्या सहा रुग्णांना घरी सोडल्यानंतर नांदेड करणार थोडासा दिलासा मिळाला होता मात्र सायंकाळी प्राप्त झालेल्या अहवालानंतर नांदेडकरांची चिंता पुन्हा एकदा वाढ झाली आहे .