पावसाळयापुर्वी करावयाच्या देखभालीसाठी नांदेड शहर व परिसरातील काही भागाचा वीजपुरवठा बंद

नांदेड जिल्हा नांदेडच्या बातम्या

नांदेड : वैजनाथ स्वामी

महावितरण व महापारेषणकडून पावसाळापुर्व करावयाच्या देखभाल दुरूस्तीसाठी आज (दि.२१ मे) नांदेड शहरातील काही परिसराचा वीजपुरवठा बंद करण्यात येणार आहे. वीजग्राहकांनी याची नोंद घेवून वीजपुरवठा बंद असलेल्या काळात सहकार्य करावे असे अवाहन महावितरणच्या वतीने करण्यात आले आहे.

पावसाळयातील वादळी वाऱ्यामुळे वीजपुरवठा खंडीत होवू नये यासाठी महावितरण व महापारेषण कंपनीच्या वतीने पावसाळयापुर्व देखभाल दुरूस्तीची कामे हाती घेतली जातात.त्यामुळे गुरूवार दि.२१ मे २०२० रोजी नांदेड शहराला वीजपुरवठा करणाऱ्या १३२ केव्ही जंगमवाडी उपकेंद्रा अंतर्गत येणाऱ्या ११ केव्ही विद्युत भवन वीजवाहिनीवरील नवामोंढा,दत्त्नगर, सांगवी,विमानतळ परिसर, एमजीएम परिसर तसेच ११ केव्ही आनंद नगर,पोलस कॉलनी, विवेक नगर,गणेश नगर, गजानन मंदीर व पावडेवाडी वीजवाहिनीवरील परिसराचा वीजपुरवठा सकाळी ८ ते दुपारी २ वाजेपर्यंत बंद राहील.

१३२ केव्ही इलीचपुर उपकेंद्रा अंतर्गत येणाऱ्या ३३केव्ही तुप्पा, एसआरटी, कौठा वीजवाहिनीवरील विष्णुपुरी, असर्जन, कौठा, पुणेगाव, काळेश्वर, व पांगरा आदी परिसराचा वीजपुरवठा सकाळी ७ ते दुपारी २ वाजेपर्यंत बंद राहील.

. १३२ केव्ही जंगमवाडी उपकेंद्रा अंतर्गत येणाऱ्या ३३केव्ही देगाव वीजवाहिनीवरील तेलगाव, देगाव व पिंपळगाव आदी परिसराचा वीजपुरवठा सकाळी ९ ते दुपारी ५ वाजेपर्यंत बंद राहील