नांदेड कोरोना : रुग्णांची संख्या शंभरीपार ; संख्या झाली 106 ; आज रात्री आढळले आठ रुग्ण ; दिवसभरात 9 रुग्णांची नोंद

ठळक घडामोडी नांदेड जिल्हा

नांदेड : आज (मंगळवारी) दिवसभरात ९ पॉझिटिव्ह रूग्ण आढळले असूज रुग्णांची संख्या 106 वर पोहचली आहे.

नांदेड जिल्ह्यात मंगळवारी सकाळी व रात्री १०.३० वाजता मिळून एकूण १६१ अहवाल प्राप्त झाले. त्यातील ९ पॉझिटिव्ह तर १४६ अहवाल निगेटिव्ह आहेत. ९ अहवाल अनिर्णीत आहेत.

आज आढळलेले बाधित रूग्ण
– कुंभार टेकडी रूग्ण संपर्कातील ६ जण बाधित
– करबला मयत रूग्ण संपर्कातील दोन जण
– अबचल नगर रूग्ण संपर्कातील एक जण
असे नऊ जण पॉझिटिव्ह असल्याचे समजते.

देशभरात कोरोनाचा संसर्ग प्रचंड वाढत असताना नांदेड तब्बल तीस दिवस कोरणामुक्त होते. ग्रीन झोन मध्ये राहिलेल्या नांदेडमध्ये एकदा कोरोना चा शिरकाव झाला आणि बघता बघता वीस-बावीस दिवसात नांदेडमध्ये कोरोना च्या रुग्ण संख्येने शतक पार केले.

आज रात्री दहा वाजता प्राप्त झालेल्या रिपोर्ट मध्ये आठ जणांना कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे नांदेडमध्ये आता कोरोना बाधीतांचीं संख्या 106 वर पोहोचली आहे.
आज प्राप्त झालेल्या 137 रिपोर्ट पैकी 124 रिपोर्ट निगेटिव आले तर आठ जणांना कोरोनाची बाधा झाल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे. नागरिकांनी सुरक्षित राहावे. अत्यावश्यक कामासाठीच घरा बाहेर पडावे असे आवाहन जिल्हा शल्यचिकित्सक डॉ भोसीकर यांनी केले आहे.