राज्य सरकारच्या विरोधात अक्कलकोट भाजपाचे महाराष्ट्र बचाव आंदोलन

इतर बातम्या महाराष्ट्र

अक्कलकोट : रुद्रय्या स्वामी 

राज्य सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे कोरोनाचा वाढता फैलाव तसेच राज्यसरकार कडून जनतेला कोणतीही मदत मिळत नसल्यामुळे तसेच राज्यातील विशेषतः मुंबईतील कोरोनाची समस्या दिवसेंदिवस गंभीर होत चालली असून राज्य सरकार निष्क्रीय झाले आहे.

राज्यातील महाविकास आघाडीला जागे करून कोरोना रोखण्यासाठी काम करण्यास भाग पाडण्याच्या हेतूने राज्य सरकार विरोधात अक्कलकोट भाजपच्या वतीने “महाराष्ट्र बचाव आंदोलन”करून तहसिलदार अंजली मरोड यांना कोरोना संदर्भात विविध उपाययोजना व मदत निधीच्या बाबतीत निवेदन देण्यात आले.

यावेळी खासदार डॉ जयसिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामीजीं, आमदार श्री सचिनदादा कल्याणशेट्टी, उपनगराध्यक्ष यशवंततात्या घोंगडे,पक्षनेता महेश हिंडोळे,भाजप तालुकाअध्यक्ष मोतीराम राठोड, शहर अध्यक्ष शिवशरण जोजन, माजी तालुका अध्यक्ष मल्लिनाथ स्वामी, प्रभाकर मजगे उपस्थित होते