नांदेड : कोरोना रुग्णांची शतकाकडे वाटचाल ; संख्या झाली ९८ ;

ठळक घडामोडी नांदेड जिल्हा

नांदेड : शहरात आज सकाळी कोरोना चा आणखी एक रुग्ण आढळला असून करबला नगर मधील 60 वर्षीय इसमास कोरोनाची लागण झाल्याचा अहवाल प्राप्त झाला असून शहरात कोरोना बधितांची  संख्या शतकाकडे वाटचाल करीत असून आज संख्या 98 वर पोहोचली आहे  तर पाच जणांचा मृत्यू झाला आहे .

कोरोना मुक्त झालेल्या २६ हुन अधिक जणांना  घरी पाठविण्यात आले आहे. किंबहुना आज प्राप्त झालेल्या २४ अहवलापैकी  एकाचा पॉझिटिव तर 23 जणांचा निगेटिव्ह  प्राप्त झाले आहेत. नागरिकांनी घाबरून न जाता सुरक्षित रहावे यासाठी काळजी घ्यावी असे आवाहन जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर निळकंठ भोसीकर यांनी केले आहे.