वैद्यकीय क्षेत्रातील कोरोना वाँरीयर – स्वप्नील कारंडे

इतर लेख संपादकीय

मुखेड  : पवन जगडमवार

विद्येचे माहेरघर म्हणून ओळखले जाणा-या पुण्यासारख्या ऐतिहासिक औद्योगिक शहरात येवून अवघ्या काही वर्षांच्या कालावधीत कर्तव्यनिष्ठेला प्राधान्य देत ग्राहकांना केवळ ग्राहक न समजता बंधुभाव बांधिलकीचे सामाजिक नाते जोपासत शहरातील सिंहगड रोडवरती आनंदनगर परिसरात ‘न्यू सिंहगड’ मेडिकलच्या माध्यमातूनच कोरोना महामारीमुळे झालेल्या लाँकडाऊनच्या काळात सर्वसामान्याचे जनजीवन सुरळीत चालावे म्हणून वैद्यकीय सेवा सवलतीच्या दराने देत कित्येक सामाजिक संस्था व गरजुंना मोफत औषधोपचार देवून माणुसकीचे दर्शन घडवत आहे. पैशांअभावी सर्वसामान्यांना औषध – गोळ्यांची कमतरता भासू नये म्हणून कित्येक ग्राहक, वयोवृद्ध जेष्ठ नागरिक, महिला यासह प्रत्येकांना विविध औषधीमागे सवलत देत ‘ग्राहक देवो भव’ ! हि वृत्ती जोपासताना दिसत आहे.

कोरोना या महाभयंकर रोगाने संपूर्ण जगासह भारत देशात थैमान घातले असतांना अशा संकटसमयी पोलीस प्रशासन, वैद्यकीय सेवा, महसूल, स्वच्छता कर्मचारी, पोस्ट, बँकिंग या जीवनावश्यक सेवा जोखीम घेवून सातत्याने कार्यरत आहेत यातील पहिल्या काही सेवेबद्दल नेहमीच कौतुक होते. पुरवठ्याबाबत तक्रारीचा सुर असतो पण वैद्यकीय सेवेतील औषधी दुकानांची सहसा कोणी दखल घेत नाहीत अशी स्थिती आहे मात्र लाँकडाऊनच्या काळात अन्य व्यवहार बंद असले तरी वैद्यकीय क्षेत्रातील लोक घरापासून दूर अखंड सेवेत कार्यरत असतांना प्रत्यक्ष औषधे गोळ्या देण्याघेण्यापासून पैसे देतांना-घेतांना असे अनेक व्यवहार करतांना संक्रमणाचे धोके आहेत तरीही अशा कठीण प्रसंगाचा सामना करत संकटसमयी आपल्या घरी कुटुंबात न थांबता कोरोनाच्या महासंकटावर मात करण्यासाठी वैद्यकीय सेवेतील औषधी दुकानांतील करोना योध्दा स्वप्नील कारंडेचे काम निश्चितपणे कौतुकास्पद आहे.

कारंडे मुळचे सोलापूरचे पण व्यवसायाच्या निमित्ताने पुण्यात येवून स्थायिक झाले स्वप्नीलचा जन्म सोलापूरचा पण वास्तवाने कर्तव्यात कसुर नाही लोकांची सहानुभूती पाळत आपल्या व्यवसायामुळे अनेकांशी उत्तम संबंध प्रस्थापित करत ग्रामीण भागातील असुनही शहरी संस्कृतीशी एकरूप झालेले स्वप्नील नावाप्रमाणेच गरजूंना अडलेल्यांना, नियमात बसेल तेवढं भरभरून देणारा अनोखा करोना योध्दा आहे. स्वप्नीलने चाळीशीही पुरी केलेली नाही पण काहीसे रांगडे व्यक्तिमत्त्व येता जातांना पाहिले कि कुतूहलाने चौकशी करणारा आपुलकीचा स्वभाव स्वप्नीलची आई, वडील, मुलगी आणि त्या सर्वांची काळजी घेत रिकाम्या वेळेत व्यवसायात मदत करत कुटूंबाची देखभाल करणारी गृहिणी (धर्मपत्नी) अशी कौटुंबिक स्थिती अशावेळी स्वत:च्या घरी राहणे कोणीही पसंद करील मात्र ग्रामीण भागाची नाळ असलेल्या स्वप्नीलने गेल्या एक दीड महिन्यापासून ‘मी करोना योध्दा’ आहे शेवटपर्यंत लढाई लढणारच असे ठासून सांगत सहकारी महेंद्र, प्रमोद व पांढरे यांच्या सोबतीने कर्तव्यनिष्ठेला प्राधान्य दिले त्यामुळेच आनंदनगर परिसरातील न्यू सिंहगड मेडिकलचे स्वप्नील कारंडे आज कोरोना वाँरिअर म्हणून सर्वाचे लक्ष वेधून घेत आहेत. जीवनावश्यक सेवासंबंधि कार्य करणा-या सर्व योध्दांना लेखनीतून सलाम.

एस. एन. भद्रे नांदेडकर (पुणे सायन्सटिस्ट)