बेटमोगरा ३३ के.व्ही विद्युत उपकेंद्रास आग ; मोठी हानी टळली 

नांदेड जिल्हा मुखेड
मुखेड : पवन जगडमवार

मुखेड तालुक्यातील बेटमोगरा येथील ३३ के.व्ही विद्युत उपकेंद्रात दि.१८ मे रोजी दुपारी २ वाजताच्या सुमारास अचानक आग लागल्याची  घटना  घडली .

        ३३ के.व्ही विद्युत केंद्रातील विद्युत तारांची स्पर्किंग झाली आणि सभोवताल वाढलेल्या गवतासह ही आग पेट घेत मोठे उग्र रूप धारण केली  परंतु विद्युत केंद्रातील ऑपरेटर पी..ए .कांबळे  यांनी लाईनमन एस.व्ही.स्वामी,पंडित गवाले यांच्या सहकार्याने वेळीच सावधगीरी बाळगून ही लागलेली आग विझवून होणारा मोठा अनर्थ टाळला.
 या अचानक लागलेल्या आगीमुळे तब्बल दोन तास वीज पुरवठा खंडित करण्यात आला होता.बेटमोगरा येथील ३३ के.व्ही. विद्युत केंद्रांतर्गत परिसरातील १४ गावांना येथून वीजपुरवठा होतो तर लागलेल्या आगीमुळे कसल्याही प्रकारची जीवित हानी झाली नाही