धनगरांच्या पारंपारिक वेशात पडळकरांनी घेतली शपथ

Uncategorized ठळक घडामोडी महाराष्ट्र

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह विधानपरिषदेवर बिनविरोध निवडून आलेले भाजपचे गोपीचंद पडळकर यांनी आज आमदारकीची शपथ घेतली आहे. यावेळी शपथविधी सोहळ्यासाठी गोपीचंद पडळकर खास धनगरी पारंपारिक वेशात विधानभवनात आले होते.

दरम्यान, विधानपरिषदेत फक्त धनगरच नाही तर समस्त बहुजन समाजाचा आवज होऊन सरकारला जाब विचारण्याचे काम करणार असल्याचा निर्धार पडळकर यांनी बोलून दाखवला आहे. तर आजपर्यंत ज्या वंचित समाजाचा आवाज या सभागृहापर्यंत पोहचला नाही त्यांचा आवाज मी आता उठवणार असल्याच गोपीचंद पडळकर यांनी सांगितल आहे.