शेतकऱ्यांना दुष्काळी अनुदानाचे पैसे जलदगतीने वाटप करा ; अन्यथा बँकेला कुलूप लावू – दत्ता पाटील माळेगावे यांचा इशारा

नांदेड जिल्हा मुखेड

मुखेड : पवन जगडमवार

मुखेड तालुक्यातील मुक्रमाबाद येथील मध्यवर्ती बँके मध्ये शेतकऱ्यांचे दुष्काळी अनुदान जमा झालेले आहे. पण संबंधित मॅनेजर हे अनुदान वाटपास विलंब करीत आहेत. शेतकऱ्यांनी बँकेला संपर्क केला असता शेतकऱ्यांना आठ दिवसांत वाटप सुरू होणार आहे. अशी उडवा उडवीची उत्तरे दिली जातात. सततच्या दुष्काळाने व देशांमध्ये कोरोना महामारीने देशासह राज्यात सुध्दा हाहाकार माजला आहे. संपुर्ण देशात लाँकडाऊन आहे. लाँकडाऊनच्या काळात शेतकऱ्यांना भाजीपाला, टरबुज पिकाला मोठ्या प्रमाणावर झटका बसला आहे.

अगोदरच शेतकऱ्यांना अतिवृष्टीने पिकांचे मोठे नुकसान झाले होते. त्यातुनच शेतकरी कसा बसा बाहेर आला असता, मध्येच कोरोना सारख्या महामारीने शेतकऱ्यांचे लाँकडाऊनच्या काळात नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे शेतकरी हवालदिल झालेला आहे. तरी सुद्धा या बँकेच्या कर्मचाऱ्यांना काही घाम फुटतचं नाही.

तीन ते चार महिन्यापूर्वी मध्यवर्ती बँकेत शेतकऱ्यांचे दुष्काळी अनुदान जमा झाले असताना सुद्धा सर्व शाखेतील दुष्काळी अनुदान वाटप करण्यात आले आहे. पण मुक्रमाबाद शाखेतील दुष्काळी अनुदान वाटपाचे कामकाज संथगतीने चालू आहे.खरीपाच्या पेरणीच्या मुहूर्तावर शेतकऱ्यांना मदत व्हावी म्हणून दिलेला अनुदान असतानाही आजपर्यंत वाटप करण्यात आले नाही. पेरण्या जवळजवळ आल्या आहेत तरी सुध्दा शेतकऱ्यांच्या हातामध्ये अद्यापही पैसे मिळाले नाहीत. शासन दुष्काळी अनुदान देण्यासाठी तयार आहे पण बँकेचे कर्मचारी हलगर्जीपणा करत आहेत.शेतकऱ्यांना लवकरात लवकर दुष्काळी अनुदान वाटप केले तर पैसे शेतकऱ्यांच्या कामी येतील.

 

लाँकडाऊनमुळे शेतकरी अडचणीत सापडलेला आहे. शेतकऱ्यांना पेरणीसाठी खते बि-बियाणे घेण्यासाठी जवळ पैसे नाहीत. त्यामुळे शेतकऱ्यांना सावकारांच्या उंबरठ्यावर कर्जासाठी जावे लागेल. मुक्रमाबाद येथील नांदेड जिल्हा मध्यवर्ती बँकेकडे 28 गावाचे दुष्काळ वाटप आहे.आज मे महिना उजाडला आहे.तरी त्यांनी 28 पैकी 7 ते 8 गावाचे वाटप झाले आहे. 20 गावे वाटपाचे शिल्लक आहेत. आणि अशीच वाटपाची बँकेकडून गती राहिली तर संपूर्ण शेतकऱ्यांच्या हातात पैसे पडायला दुसरा वर्ष ही निघुन जातो की काय ? असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे. म्हणून शेतकऱ्यांचे दुष्काळी अनुदान बँकेने जलदगतीने वाटप न केल्यास,ज्या गावातील दुष्काळ वाटप शिल्लक आहे,त्या गावातील शेतकऱ्यांना सोबत घेऊन बॅंकेला कुलूप ठोकू असा इशारा स्वाभिमानी संभाजी ब्रिगेड चे माजी जिल्हा संपर्कप्रमुख दत्ता पाटील माळेगावे यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना सांगितले आहे.