वडार समाजाला कोरोनाच्या संकट काळात रामदास पाटील मित्र परिवाराच्या वतीने मदतीचा हात… डॉ. श्रावण रॅपनवाड यांच्या हस्ते किट वाटप 

नांदेड जिल्हा मुखेड

मुखेड : ज्ञानेश्वर डोईजड 

वडार समाज तसा गरीबच अन गरीबी तर पाचवीलाच पुजलेली, दगडाला आकार देऊन देव बनवणारा समाज….खरं तर माणसाला देवत्व देणारा समाजच  … पण आज मात्र कोरोनाच्या संकट काळात उपासमारीची वेळ. दोन महिणे झाले घरातल्या बनवलेल्या वस्तु बाहेर गेल्याच नाहीत…त्यामुळे संसाराच्या चुली मात्र पेटल्याच नाहीत…याच संकट काळात रामदास पाटील मित्र परिवाराच्या वतीने वडार समाजातील गरजुंना धान्य वाटप दि. 17 मे रोजी करण्यात आले.

यावेळी वडार समाजाचे नेते डॉ. श्रावण रॅपनवाड, युवा कार्यकर्ते गजानन दंडलवाड, नगरसेवक प्रा. विनोद आडेपवार, ज्ञानेश्वर  डोईजड, नितिन टोकलवाड, योगेश पाळेकर, गजानन पांचाळ, सचिन पवार, अनिकेत बनसोडे यांची उपस्थिती होती.

वडार समाज अत्यंत वंचित समाज म्हणुन ओळखला जातो. गरीबीमुळे लहाणपणीच अनेकांना कामावर जावे लागते त्यामुळे अशिक्षितपणा आला यामुळे समाजाची म्हणावी तशी प्रगती झालेली नाही. कोरोनामुळे अनेकांचे कामधंदे बंद झाले शासन , प्रशासनाची अनेकापर्यंत मदत अद्याप मदत पाहचलेली नाही अशातच हिंगोलीचे मुख्याधिकारी असलेले रामदास पाटील यांनी विविध समाजास मुखेड – कंधार मतदार संघात अनेकांना धान्य वाटप केले तसे वडार समाजासही वंचित असलेल्या गरजु कुटुंबांस धान्य किट देऊन मदतीचा हात दिला.

वडार समाजास मोलमजुरी  शिवाय पर्याय नाही पण सर्वच बंद असल्याने आता कामही मिळत नाही. मागील दोन महिण्यापासुन कोरानामुळे लॉकडाऊन अन आता सरकारने दि. 31 मे पर्यंत लॉकडाऊनची घोषणा केली यामुळे शासनानेही  मदतीचा हात दयावा अशी मागणी समाजातून ऐकायला मिळत होती.


         मुखेड – कंधार मतदारसंघात प्रत्येक गावात जमेल त्याप्रमाणे रामदास पाटील यांनी त्यांच्या मित्र परिवाराच्या वतीने हातावर पोट असणाऱ्या  गोर गरीबांना मदत करीत आहेत. मुखेड तालुका तसा डोंगराळ भाग असुन तालुक्यात मोठा कामगार वर्ग आहे. रामदास पाटील हे लोकप्रतिनिधी नसतानाही या कठीण प्रसंगी लोकप्रतिनिधीला लाजवेल असे काम करीत आहेत.

 डॉ. श्रावण रॅपनवाड
राष्ट्रीय नेते, वडार समाज