नांदेड : सोमवारपासून व्यापारी व ग्राहकांना मोठा दिलासा ; उघडणार ही दुकाने

ठळक घडामोडी नांदेड जिल्हा

नांदेड : सोमवारपासून काही दुकाने अटी शर्तींच्या अधिन राहून उघडली जाणार आहेत.यासंबंधीचे आदेश जिल्हाधिकारी डॉ. इटनकर यांनी रविवार दि. 17 मे रोजी काढले.

रविवारी काही दुकाने घडण्याबाबत जिल्हाधिकार्‍यांनी सहमती दर्शविली असून त्यासंबंधीचे आदेश निर्गमित करण्यात आले आहेत.

–—————
सकाळी सात ते दोन अशी खालील दुकाने उघडतील
अ‍ॅटोमोबाईल्स, संगणक/इलेक्ट्रॉनिक्स/इलेक्ट्रीकल्स/टायर्स, बॅटरी, मोबाईल शॉपी, रस्सी, वॉट स्टोअर्स, स्टेशनरी/बुक स्टोअर्स,सायकल मार्ट, स्टील टे्रडर्स, बिल्डीग मटेरियल्स वरील सर्व दुकाने सोमवार ते शुक्रवार याच काळात उघडी राहणार आहेत.

 

 

किरणा दुकान हे रविवार वगळून सकाळी सात ते दुपारी दोन वाजेपर्यंत चालू राहिल, तर रुग्णालय व औषणधालय हे चौविस तास सुरु राहणार आहेत. या आदेशामुळे व्यापारी व ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला आहे.