नांदेड कोरोना : आज 13 कोरोना पॉजिटिव्ह रुग्ण ; वाढते आकडे चिंताजनक

ठळक घडामोडी नांदेड जिल्हा

नांदेड, :  दि. 14 ते 16 त मे दरम्यान असे दोन दिवसांचे प्रलंबित असलेले 374 अहवाल रविवार दि. 16 मे रोजी प्राप्त झाले. यात 13 अहवाल पॉझिटीव्ह तर 361 अहवाल निगेटीव्ह आले. यामध्ये बारा पुरुष व एक महिलेचा समावेश आहे.

तेरा रुग्णांमध्ये नऊ रुग्ण हे परराज्यातील यात्रेकरू आहेत.अनेक आठवडयांपासून नांदेडमध्ये अडकून पडले आहेत. यात पुन्हा करबला नगर मध्ये एक रुग्ण आढळून आल्याने या भागातील रुग्णांची संख्या 6 इतकी झाली आहे. यापूर्वी एक, काल चार व आज एक असे रुग्णसंख्या आहे. अबचल नगरमध्ये यापूर्वी आढळून आले आहेत. बारडमध्ये एक असे तेरा जणांचा समावेश आहे.

आज आढळलेल्या तेरा रुग्णांमध्ये बारा पुरुषांचे वय हे 13, 14, 14, 19, 24, 25, 30, 37, 44, 50, 59 व 74 असे आहेतर तर एक महिलेचे वय 57 वर्षे इतके आहे. चार जण 14 ते 19 वर्षे वयोगटातील आहेत. कालच्या आकडेवारीत ही पंधरा जण हे सगळे तरूण होते. बारा जणांना कोविड केअर सेंटर यात्री निवास येथे तर एका रुग्णास बारड येथील धर्मशाळेत उपचार सुरु आहेत.

——
उपचार घेणारे 64 रुग्ण
आतापर्यंत कोरोनाची लागण 97 लोकांना झाली आहे. यात पाच जणांचा मृत्यू यापूर्वी झाला. दोन कोरोना पॉझिटीव्ह रुग्ण सापडू शकले नाहीत. 26 जण हे कोरोनामुक्त होऊन घरी गेले आहेत. तर उर्वरीत 64 रुग्णांमध्ये आठ जणांवर डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, 52 जणांवर यात्री निवास कोविड केअर सेंटर येथे तर दोघांवर बारड येथे उपचार सुरु आहेत.