राज्याच्या कानाकोपऱ्यातून येणाऱ्या नागरिकासाठी रामदास पाटील सुमठाणकर मित्र परिवार कडून पाण्याची सोय

नांदेड जिल्हा मुखेड

मुखेड : प्रतिनिधी

मुखेड येथे महात्मा ज्योतिबा फुले महाविद्यालय येथे  fever clinic( ताप चिकित्सा लय) सेंटर उभारले असून  परिसरात बरेच नागरिक पुणे, मुंबई ,हैद्राबाद,व राज्याच्या कानाकोपऱ्यातून हजारोंच्या संख्येने लोक 10, 12 तास प्रवास करून येत आहेत.

 

दिवसभर ,उन्हात लहान लहान मुले सुद्धा रांगेत ताटकळत उभा राहत आहेत . त्यासाठी त्यांना पाणी पिण्यासाठी सोय रामदास पाटील सुमठाणकर मित्र परिवार मुखेड कडून करण्यात आले.

यावेळी वैद्यकीय अधीक्षक डॉ आनंद पाटील, नगर सेवक प्रा. विनोद आडेपवार, ज्ञानेश्वर डोईजड,वीरभद्र चांडोळकर,  नितीन टोकलवाड, योगेश पाळेकर, महेश पाटील, बालाजी बाभळे,सचिन इंगोले, मारोती घाटे,सचिन पवार उपस्थित होते.