पेठवडज सर्कल मधील सर्व प्रश्न मार्गी लावा अन्यथा तीव्र आंदोलन- केंद्रे

कंधार नांदेड जिल्हा

कंधार : प्रतीनिधी

विधानसभा निवडणुकीच्या काळात मुखेड मतदारसंघातील राजकारणी लोकांनी विविध आश्वासने देऊन पेठवडज सर्कल मधील जनतेची मत मिळवली. निवडणूक पार पडल्यावर मात्र त्यांना दिलेल्या आश्वासनाचा विसर पडल्याचं दिसत आहे.

पेठवडज हे मुखेड मतदारसंघातील मोठं गाव.. पेठेच गाव असल्यामुळे येथे नेहमी वर्दळ असते. स्वराज्यनिर्माते, आमचे दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचा गावातील पुतळा अर्धाकृती असल्यामुळे गावकर्यांनी पूर्णाकृती पुतळ्याची मागणी वारंवार केली पण राजकारणी लोकांनी त्यांच्या तोंडाला फक्त पानेच पुसली.

पेठवडज गावात अंतर्गत रत्याच्या बाजूला असलेल्या खांबावर लाईटच नसल्याने तेथील जनता मेटाकुटीस आली आहे.
कल्हाळी गावात छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा बसवण्याची मागणी कित्येक वर्षापासुन होत असून सुद्धा त्या मागणी कढे दुर्लक्ष होत आहे. गावातील अंतर्गत नाली चा प्रश्न असो किंवा स्मशानभूमीचा, गावकर्यांनी वेळोवेळी पाठपुरावा केला तरी कोणीही लक्ष देत नसल्याने गावकरी येणाऱ्या निवडणुकीत मतदानावर बहिष्कार टाकण्याच्या तयारीत आहेत

देवइचीवाडी येथे मातंग समाजाकडून सभागृहाची मागणी होत आहे, तसेच गावकऱ्यांकडून स्मशानभूमी चा प्रश्न वेळोवेळी उपस्थित झाला आहे, पण त्यांना फक्त आश्वासन च मिळत आहेत.

देवइचीवाडी क्र. 2 च्या रस्त्यासाठी आणि सभागृहसाठी गावकर्यांनी निवडणुकीच्या वेळेस लोकप्रतिनिधीसमोर मागणी केली होती. पण एक महिन्याच्या आत सर्व प्रश्न सोडवू असं आश्वासन दिलं गेलं होत.

जनतेतून अश्या विविध मागण्या होऊन देखील फक्त आश्वासन मिळत असल्याने जनता हवालदिल झाली आहे. ‘आमचे प्रश्न सुटणार कधी’ हा प्रश्न जनता आता विचारू लागली आहे. जनतेच्या मागण्या लवकरात लवकर पूर्ण झाल्या नाहीतर मोठं आंदोलन उभारण्यात येईल असा इशारा युवा नेते संदीप केंद्रे यांनी दिला.