मुखेडात अवैध वाळु वाहतुक ; पाेलिसांच्या धरपकडीनंतर तहसीलदारांची कारवाई ; कोरोनामुळे वाळु वाहतुकदारांची अवैध चांदी

ठळक घडामोडी नांदेडच्या बातम्या

अवैध वाळु वाहतुक करणा-या वाहनास २ लाख ९१ हजाराचा दंड

मुखेड : संदिप पिल्लेवाड

सध्या देशात लाॅकडाऊन असुनही अवैध वाळु वाहतुक करणा-यांनी मात्र जोर धरला आहे. लाँकडाऊनचा फायदा घेत मध्यरात्री शहरातून ग्रामीण भागात अवैधरित्या वाळू वाहतुक करणा-या एका हायवा गाडीस पाेलिसांनी अडवून हटकले असता त्याच्याजवळ काेणताही वाहन परवाना व राॅयल्टी पावती आढळून न आल्याने सहाय्यक पाेलिस निरीक्षक भाऊसाहेब मगरे यांनी गाडी ताब्यात घेऊन तहसीलदारांना कळविले असता त्यास २ लाख ९१ हजार पाचशे रूपये दंडाची आकारणी करण्यात आली आहे.

या कारवाईमुळे लाॅकडाऊनमध्येही अवैध वाहतुक करणा-यांचे धाबे दणाणले आहेत. गेल्या दीड-दाेन महिन्यापासून काेराेना विषाणूच्या वाढत्या प्रादूर्भावामुळे देशभरात लाॅकडाऊन लागु करण्यात आले आहे. यामुळे काेणत्याही वाहनास परवाना असल्याशिवाय रस्त्यावर फिरण्यास मनाई करण्यात आली आहे.

त्यातच लाकडाऊनचे कठाेर पालन करण्यासाठी साेमवारी दि. .११ रात्री दीडच्या सुमारास सहाय्यक पाेलिस निरीक्षक भाऊसाहेब मगरे हे पाळा येथे गस्तीवर असताना मुखेडकडुन एक हायवा गाडी (एम.एच.२६-बी.ई.- ९३००) येत असल्याचे दिसले. काचेवर काेणताही पास प्रथम दर्शनी नसल्याने त्यास हटकले असता बेकायदेशीरपणे वाळू वाहतुक करीत असल्याचे दिसून आले. त्यावेळी तहसीलदार काशिनाथ पाटील यांचेशी संपर्क करून ही गाडी पाेलिसांनी ताब्यात घेतली. गुरूवारी (दि १४ ) जप्त करण्यात आलेल्या गाडीतील वाळूचा मंडळ अधिकारी व तलाठी यांनी पंचनामा केला असता दाेन लाख ९१ हजार पाचशे रूपये इतका दंड आकारण्यात आल्याची माहिती तलाठी बोरसुरे यांनी दिली.


लाॅकडाऊच्या काळात अधिका-यांचे चांगभलं..!
काेराेनाच्या पार्श्वभूमीवर देशभरात लागू केलेल्या लाॅकडाऊनमुळे जीवनावश्यक वस्तु वगळता सर्वच व्यापारांना व वाहनांना बंदी घालण्यात आली आहे. दरम्यान या काळात
काही तांत्रिक अडचणी असलेल्या वाहनांना साेडून देणे किंवा माेठ्या व्यापा-यांना अभय देणे याबराेबरच स्थानिक पातळीवर चालु असलेल्या वाळू वाहतुकीला
मदत करण्यासाठी महसुल व पाेलिस अधिका-यांनी विशेष माया दाखविली आहे. सध्या मुखेड शहरातून रात्री एक वाजल्यापासून पहाटे सहा वाजेपर्यंत आठ ते दहा हायवा
गाडी व दहा अकरा ट्रॅक्टर वाळू वाहतुकीच्या कामात चालु असून जिल्हाधिका-यांनी याकडे लक्ष द्यावे अशी मागणी जनतेतून केली जात आहे. गेल्या दाेन महिन्यापासून व्यापार व राेजंदारीवरील मजुरांचे उत्पन्नांचे साधन बंद झाले असले तरी लाॅकडाऊनच्या काळात अधिका-यांचे व अवैध धंदे करणा-यांचे मात्र चांगभलं झालं असल्याची चर्चा जनतेतून केली जात आहे.