धक्कादायक : नांदेडला आज १८ कोरोना पॉझिटिव्ह रूग्ण आढळले! रुग्णांची संख्या झाली ८४ वर ; लॉकडाऊनला सूट दिल्याचा परिणाम ?

नांदेड जिल्हा मुखेड

नांदेड : आज शनिवारी  नांदेडला आणखी १८ पॉझिटिव्ह रूग्ण आढळले असून   बाधितांची संख्या ८४ वर पोहचली तर   २६ जणांना दिला डिस्चार्जहि मिळाला  आहे .

यात  पाच जणांचा मृत्यू, दोघे फरार असून  ५१ रुग्णांवर उपचार सुरू आहे . आजच्या नवीन रुग्णांमध्ये १३ रुग्ण प्रवासी आहेत. ४ रुग्ण करबला भागातील आहेत व १ रुग्ण सराफा, कुंभार गल्ली, नांदेड येथील रहिवासी असून तो शासकीय आयुर्वेद रूग्णालयात दाखल आहे. याबाबतची अधिकची माहिती ११ वाजेपर्यंत देण्यात येईल असे  आरोग्य  विभागाने  सांगितले  आहे .

 

पण  वाढणारा  आकडा  हा  नांदेड  साठी  धोकादायक असून लॉकडाऊन ला  सूट  मिळाल्याने  हा  आकडा  वाढला  असल्याचे  अनेकांचे  म्हणणे  आहे .