दिव्यांग बांधवाना पालकमंत्री, खासदार, आमदार निधीतून उदरनिर्वाहासाठी दहा हजार रुपये अनुदान देऊन आधार द्यावा – चंपतराव डाकोरे पा. कुंचेलीकर

नांदेड जिल्हा नांदेडच्या बातम्या

नांदेड : शासन प्रशासन,लोकप्रतिनिधी अशा संकटकाळी ज्यांना आधार नाहि, व ज्यांना कोणतेही काम करता येत नाही अशा दिव्यांग वृध्द निराधार याना मदत करणे व त्यांचा हक्क देणे त्या शासन प्रशासनाचे कर्तव्ये असल्यामुळे शासन अनेक योजना जाहीर करण्यात येऊन प्रशासन अद्याप या योजनेचा दिव्यांग वृध्द निराधार याना लाभ मिळत नसल्यामूळे अशा संकटकाळी उपाशी मरण्याची वेळ येऊ देऊ नये अशी कळकळीची विनंती चंपतरा डाकोरे पाटिल यांनी केले.

दिव्यांग व वृध्द निराधार याना अनेक योजनेची घोषणा भारताचे अर्थमंत्री यांनी केला व दिव्यांग आयुक पुणे यांनी घोषित केलेल्या योजनेची त्वरित अंमलबजावणी करावी म्हणून दिव्यांग आयुष्य पुणे यांनी दिनांक. 26 मार्च रोजी लेखी आदेश देऊन अद्याप दोन महिन्यापासून अंमलबजावणी केली नसल्यामुळे दिव्यांग बांधताना उपाशी मरण्याची वेळ आली आहे.

अशा संकटकाळी दिव्यांग बांधवांचा हक्काचा वैयक्तिक पाच टक्के निधी स्थानिक स्तरावर ग्रामपंचायत नगरपंचायत नगरपालिका महानगरपालिका पंचायत समिती जिल्हा परिषद आमदार निधी खासदार निधी हे आमच्या हक्काचे देऊन संकटकाळी मदत करावी म्हणून लोकप्रतिनिधी, प्रशासन यांना अनेक निवेदन मो. फोन करून न्याय मिळत नसल्याने संपादक पञकार व चॅनल लाईव्ह वर शासन प्रशासनास जागे करण्यासाठी प्रयत्न केल्यामुळे काहि प्रमाणात ग्रामपंचायत, नगरपालिका महानगरपालिका यांनी दिव्यांग निधी दिला.

 

पण खासदार, आमदार, पालकमंत्री, जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी जागे होत नसल्याने कांही तालुक्यात पञकार, सामाजिक कार्यकर्ते,यांनी दिव्यांग वृध्द निराधार याना धान्य पुरवठा करून माणुसकीचे दर्शन दाखविण्याचा प्रयत्न केला पण दिव्यांग वृध्द निराधार यांना निवडणूक वेळि अनेक आश्वासन देऊन सुध्दा आज त्यांना का आठवण येत नाही? सामाजिक कार्यकर्ते, पञकार यांचा आर्दश लोकप्रिय खासदार, पालकमंत्री, आमदार यांनी घेऊन प्रत्येकी दहा हजार रुपये अनुदान देऊन आधार द्यावा असे आव्हान दिव्यांग वृध्द निराधार मित्र मंडळ महाराष्ट्र संस्थापक अध्यक्ष चंपतराव डाकोरे पाटिल कुंचेलीकर यांनी केले