कृषी क्षेत्रासाठी 1 लाख कोटींचं पॅकेज, अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांची घोषणा…

ठळक घडामोडी महाराष्ट्र राष्ट्रीय

नवी दिल्ली | पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर केलेल्या 20 लाख कोटी आर्थिक पॅकेज विषयी माहिती देण्यासाठी आज सलग तिसऱ्या दिवशी अर्थमंत्री निर्मला सीतारामन पत्रकार परिषद घेत आहेत. यावेळी अर्थ राज्यमंत्री अनुराग सिंह ठाकुर देखील उपस्थित आहेत. या पॅकेजअंतर्गत शेती आणि शेतीशी निगडीत इतर उद्योगधंद्याना काय दिलासा मिळणार आहे, यासंदर्भात आज घोषणा केल्या जात आहेत. कृषी क्षेत्राची क्षमता आणि इन्फ्रास्ट्रक्चर विकसीत करण्यासाठी 11 मोठ्या घोषणा आज करण्यात येणार असल्याचं अर्थमंत्री सीतारामन यांनी म्हंटल आहे. शेतीच्या पायाभूत सुविधांसाठी 1 लाख कोटींचं पॅकेज देण्यात आल्याची घोषणा केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केली. कृषी क्षेत्रातील पायाभूत सुविधांसाठी हे पॅकेज जाहीर करण्यात आली आहे. खाद्य पदार्शांशी संबंधित उद्योगांना 10 हजार कोटींची मदतही जाहीर करण्यात आली आहे असंही निर्मला सीतारामन यांनी जाहीर केलं.

अर्थमंत्र्यांनी केलेल्या काही महत्वाच्या घोषणा

लॉकडाऊन दरम्यान, 74,300 कोटींपेक्षा जास्त किंमतीची किमान आधारभूत खरेदी, पंतप्रधान किसान योजनेंतर्गत 18,700 कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात, पंतप्रधान पीक विमा योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना 6,400 कोटी रुपये

गेल्या दोन महिन्यात शेतकऱ्यांसाठी अनेक पावलं उचलण्यात आली लॉकडाऊनदरम्यान 74 हजार 300 कोटी रुपये शेतकऱ्यांना दिले, यातील 18700 कोटी थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात आले असल्याची माहिती.

ऑपरेशन ग्रीन नावाने 500 कोटींची योजना, 6 महिने वाहतुकीसाठी 50% सबसिडी मिळणार

कृषीपुरवठा साखळीसाठी अतिरीक्त 500 कोटी, मधुमक्षिकापालनासाठी 500 कोटी रुपये, 2 लाख मधुमक्षिकापालकांना याचा लाभ होणार असल्याचं अर्थमंत्र्यांनी म्हंटल आहे.

भाजीपाला पुरवठ्यासाठी ‘ऑपरेशन ग्रीन’, भाजीपाल्याच्या वाहतुकीसाठी 50 टक्के अनुदान तसेच मधुमक्षिकापालनासाठी 500 कोटी रुपयांचं अनुदान जाहीर यातून जवळपास 2 लाख मधुमक्षिकापालकांना लाभ होईल

वनऔषधींसाठी 4 हजार कोटी रुपयांची मदत, वनऔषधींसाठी उत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्यांचे उत्पादन 5 हजार कोटीने वाढेल, 10 लाख हेक्टर क्षेत्रावर वनऔषधी घेणार असल्याचं त्यांनी म्हंटल आहे.

दुग्धव्यवसाय पायाभूत सुविधांसाठी 15 हजार कोटी रुपये, 53 कोटी पशुधनासाठी लसीकरण, 13 हजार 343 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आलीय.

शेतकर्‍यांना तातडीने एक लाख कोटी रुपयांचा कृषी-पायाभूत सुविधा निधी तयार करण्याच्या सूचना तसेच फूड एन्टरप्राइजेससाठी 10 हजार कोटी रुपये देण्यात येणार, याचा फायदा जवळपास 2 लाख छोट्या फूट एन्टरप्राइजर्सला मिळणार