लाँकडाऊनमध्ये अडकलेले मजूर,विस्थापित कामगार, यात्रेकरू  विद्यार्थ्यांसाठी महामंडळाच्या मोफत बसेस ईच्छुकांनी तहसील कार्यालयात नाव नोंदणी करण्याचे आवाहन 

नांदेड जिल्हा मुखेड
मुखेड  : संदीप पिल्लेवाड
         कोरोनाच्या  संकटात लाँकडाऊनमुळे मुखेड तालुक्यात अडकलेले मजूर,विस्थापित कामगार ,यात्रेकरू, विदयार्थी व इतर व्यक्तीना त्यांच्या मुळगावी जाण्यासाठी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या बसेस मार्फत मोफत पोहचविण्याची सुविधा मुखेड  प्रशासनाच्या  वतीने  करून  देण्यात  आली  असून  मुळगावी जाण्यास इच्छूक असलेल्या व्यक्तीकडून तहसील कार्यालयात अर्ज स्विकारले जात असल्याची  माहिती  तहसीलदार काशिनाथ  पाटील यांनी  दिली  आहे .
परंतु एका ठिकाणी जाण्याकरीता किमान 22 प्रवाशी आवश्यक असून 22 प्रवाशांची तहसिल कार्यालयात नोंदणी झाल्यानंतर बसची व्यवस्था करून संबंधिताना
पाठविण्याची व्यवस्था करण्यात  येणार  आहे .
तालुक्यात अडकलेल्या व्यक्तीने राज्यात  कुठेही  जायचे  असल्यास तहसिल कार्यालयात अर्ज सादर करावेत सदर अर्जासोबत वैद्यकीय प्रमाणपत्र,आधार कार्ड छायांकित प्रत सोबत जोडावे.
      या व्यवस्थेसाठी समन्वय अधिकारी म्हणुन नायब तहसिलदार  एस.एस. मामिलवाड सहाय्यक संदीप भुरे, सुनिल कुलकर्णी, नरेश धनशेट्टी यांची नियुक्ती करण्यात आली  असल्याची  माहिती  प्रशासनाकडून देण्यात  आली  आहे .