आत्मनिर्भर भारत अभियानामुळे देशाला नवी गती मिळणार – शिवशंकर स्वामी

मराठवाडा महाराष्ट्र

 

मा.पंतप्रधान नरेंद्र मोदींजींनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशातील जनता परत एकदा स्वतःच्या पायांवर कसा उभा राहिल आणि आत्मनिर्भर कसा होईल या दृष्टीने आदरणीय मोदींजींनी 20 लाख कोटींची पॅकेजची घोषणा केली आहे , या अभियानासाठी आदरणीय मोदींजींचे देशातील 130 करोड जनतेच्या वतीने आभार मानले पाहिजे, या अभियाना अंतर्गत लघु उद्योग, मध्यम उद्योग आणि गृह उद्योगांना फायदा होईल, गरीब, मध्यम वर्ग श्रमिक आणि शेतकऱ्यांसाठी हा अभियान उपयुक्त ठरेल,
भारतात लोकल आणि वोकल सप्लाय चैन निर्माण करण्यासाठी म्हणजे सर्वांनी लोकल प्रॉडक्ट्स जास्तीतजास्त उत्पादन आणि खरेदी करावे म्हणून हे अभियान राबविण्यात येत आहे, पंतप्रधानांनी सांगितल्याप्रमाणे या अभियाना अंतर्गत अर्थव्यवस्था, पायाभूत सुविधा, तंत्रज्ञान धारीत व्यवस्था,आपली डेमोग्राफी आणि मागणी- पुरवठ्याची मजबूत साखळी या पाच स्थभांवर देशवासियांना भर देणे खूप गरजेचे आहे, देशाला आत्मनिर्भर बनविण्यासाठी हे अभियान अमलात आणली आहे आणि हा अभियान भविष्यात जनतेचे हिताचा अभियान ठरेल.
असे विश्वास शिवशंकर स्वामी यांनी व्यक्त केली आहे…

– शिवशंकर स्वामी, अक्कलकोट