सावरगाव येथे रामदास पाटील मित्र परिवारातर्फे अपंग गरीबाना धान्य वाटप

नांदेड जिल्हा मुखेड

सावरगाव : चांदपाशा शेख

वाढत्या covid19 चा प्रादुर्भाव व वाढता लॉकडाउन पाहता गोरगरीब जनतेवर उपासमारीची वेळ आली आहे , व त्यांना सहकार्याची गरज होती, त्यातील मुखेड तालुक्यातील सावरगाव पी येथील गोरगरीब वृद्ध, अपंग विधवा यांच्याकडील राशन संपले होते, हाताला कोणतेही काम नाही चूल चालविणे कठीण झाले होते, कोणत्याही राजकीय पुढऱ्याकडून कोणतीही मदत आली नव्हती, पुणे मुंबई येथून आलेल्या कामगाराकडे राशन नाही, अशातच एक आशेचे किरण म्हणून रामदास पाटील सोमठाणकर यांच्या तर्फे गावातील अपंग, वृद्ध ,विधवाना राशन किट वाटप करण्यात आले. ]

गावातील 20 कुटुबांना राशन किट पत्रकार शेख चांदपाशा पत्रकार फेरोज मुजावर, यांच्या हस्ते वाटप करण्यात आली ,यावेळी गावातील नागरिक शकील भाई मोमीन सामाजिक कार्यकर्ते बालाजी रामगिरवार, सुनील कांबळे उपस्थित होते.