नांदेड काँग्रेस प्रवक्त्याचे पालकमंत्री अशोकराव चव्हाण यांना पत्र ..अन्यथा ..शेतकर्‍यांसारखेच व्यापार्‍यांच्या आत्महत्या होतील ….!

ठळक घडामोडी महाराष्ट्र

ना.अशोकराव चव्हाण साहेबांना जाहीर अनावृत्त पत्र

आदरणिय,नांदेडचे भाग्यविधाते ना.श्री अशोकराव चव्हाण साहेब,

नांदेड जिल्ह्यातील सर्व दूकानदारांच्या(अत्यावशक वगळून)वतीने जाहिर नम्र निवेदन करीत आहे.
साहेब,गेल्या दोन महिन्यांपासून आंमचे व्यवहार दूकान बंद असल्यामुळे ठप्प आहेत.
गेल्या कांही वर्षापासुन नोटबंदी,जीएसटी,नैसर्गीक आपत्ती ई.कारणामुळे व्यवसाय आधीच डबघाईला आलेला होता त्यात या कोरोनामुळे शेवटचा घाव धंद्यावर बसतोय.
मायबाप सरकारने वेळीच ऊपाय यौजना नाही केली तर शेतकर्यांसारखेच व्यापार्यांच्या आत्महत्येच्या बातम्या सरेआम होतील.
मि अतीशोक्ती नाही करत पण अर्थव्यवस्थेचा कणा म्हणजेच व्यापार समजला जातो.
मग तो मद्याचा असो की कंझुमर प्राॅडक्टसचा!
त्यासाठी मद्याला सवलत मीळालिच आहे परतुं ईतर दूकानदारांची अवस्था अतीशय बिकट झाली आहे
*माय जेवु घालीना अन् बाप भिख मागु देईना*
अशी अवस्था झालीय.
दूकानभाडे,बॅंकेचे व्याज,घरभाडे,मुनीमांच्या पगारी,अनेकवीध टॅक्सेस,घरचा खर्च हा तर आहेच याशीवाय मालाचे पेंमेंट्स त्यांचा दबाव वाढतोय ते कीती दीवस थांबतील त्यांचेही व्यवहार आहेतच.दूकानच बंद असेल खरेदी केलेला लाखो,करोडोंचा माल जागेवर बसलाय तो विकला तरच गाडा चालेल!
बर कोरोनाचे संकट कांही थाबंणारे नाही हे पाहून सरकार सार्या देशात ऊद्योगांना अस्थापनांना मुभा देत आहेत.मग आपला नांदेड जिल्हाच एवढा कोरोनाग्रस्त आहे का?
*की फक्त विषीष्ट दूकानदांरामुळेच वाढतो* ?
बॅंकाच्या,
भाजीबाजाराच्या,किराणाच्या!फर्टीलायझर,ईलेक्ट्रीक,मेकानीक, इ.च्या मुळे होत नाही काा ?
का असा पक्षपात ?
कांहीना सारी मोकळीक अन् कांहिना संचारबंदीच!
*आमचा काय गून्हा ?*
बर नांदेड शहर वगळता ऊर्वरीत तेरा तालूक्यात एकही पेशंट नाही.
मग आंम्ही दोन महिने प्रशासनाला संपुर्ण सहकार्य केल त्याचे फळ केंव्हा मीळणार ?
*साहेब,पुर्विचे सरकार चोहीबाजूने आंम्हाला अडचणीत आणलय*.
म्हणुन सरकार बदललय आता तरी न्याय मीळेल असे वाटत आहे!अन्याय करु नका.
कळकळीची विनंती आहे.दूकानदारांना मुभा द्या.अत्यावशक वस्तुसांठी सर्वसामान्यांनाही त्रास होत आहे ते विणवनी करीत असतांना कांही दूकानदार फाटक ऊघडून माल देत असतांना त्यांच्यावर गून्हे,दंड आकारला जात आहे आधीच परेशान त्यात हा जुलूम!
*आमच्याच दूकानात आंम्ही चोर ठरतोय*.!

*कालाय तस्मे नमः!*

साहेब,लवकरात लवकर निर्णय घ्या नाहीतर हा दूकानदारांचा आक्रोश ऊग्र रुप धारण करील!बांद्रा सारखी घटनाही घडू शकेल.लोक रस्त्यावर येतील.
आपणच आहात आमचे आशास्थान साहेब प्रशासनाला आदेश द्या!
दूकानदार व ग्राहकांना न्याय द्या!
*आपलाच एक त्रस्त दूकानदार प्रतिनीधी*

दिलीप कोडगिरे,मुखेड