कुंभार समाजातील गरजु नागरीकास रामदास पाटील सुमठाणकर मित्र परिवाराच्या वतीने धान्य किट वाटप

नांदेड जिल्हा मुखेड

मुखेड : पवन जगडमवार

कोरानामुळे अनेकांच्या जीवणाचा गाडा  बंद पाडण्याच्या मार्गावर आहे. त्यातच कुंभार समाजाच्या व्यवसायाची कामाची चक्रे सुध्दा थांबलेली आहेत. चाकावर सुबक माठ तयार करणारे कोरानाने त्यांचे  हात थांबवलेले आहेत. केलेला माल तसाच पडुन आर्थिक नुकसानासोबत मानसिक तानही यामुळे कुंभार समाजावर मोठे संकट आले.

याच संकटाची जाणीव ठेवून रामदास पाटील मित्र परिवाराच्या वतीने समाजाचे जेष्ठ नागरीक विश्वनाथराव कोलमकर यांच्या हस्ते कुंभार समाजाील गरजु नागरीकांना रामदास पाटील मित्र परिवाराचया वतीने धान्य किट वाटप करण्यात आले.

यावेळी नगरसेवक प्रा. विनोद आडेपवार, जयप्रकाश कानगुले, ज्ञानेश्वर  डोईजड, संजय वाघमारे, सतिष कानगुले, योगेश पाळेकर, नितिन टोकलवाड,संदिप पोफळे, मारोती घाटे आदी उपस्थित होते.